ठळक बातम्या

केज तालुक्यातील शोभेच्या दारुच्या कारखान्यात भिषण स्फोट

केज तालुक्यातील पैठण (सावळेश्वर) येथील शोभेच्या दारू निर्मिती कारखान्यात आज दि. २७ रोजी, दुपारच्या सुमारास मोठा स्फोट झाला आहे. सदरील स्फोट नेमका कशामुळे झाला हे अद्दाप समजले नसले तरी सुदैवाने या भिषण स्फोटात कुणीही जखमी किंवा कुणाचीही जीवित हानी नाही.

या बाबत समजलेली अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील युसुफवडगाव येथे गेली अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या शोभेची दारू बनवणा-या कारखान्यात आज दुपारी अचानक भिषण स्फोट झाला. यावेळी कारखान्यात सुदैवाने कोणीही उपस्थित नसल्याने कसल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. हा स्फोट एवढा भिषण होता की हा कारखाना पुर्णतः: उध्दवस्त झाला आहे.

सदरील घटनेची माहिती मिळताच युसुफ वडगाव पोलीस स्टेशन चे
सपोनि योगेश उबाळे यांनी त्वरीत घटनास्थळी भेट दिली. हा स्फोट कोणत्या कारणांमुळे झाला, शोभेची दारू बनवणारा हा कारखाना वैद्य होता की अवैद्द होता याबाबत अद्याप अधिकृत काहीही कळू शकले नाही. या प्रकरणी युसुफ वडगाव पोलीस अधिकारी, कर्मचारी तपास करत आहेत.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker