केंद्र सरकारच्या शेती विरोधी धोरणाविरुध्द किसान सभेचा मार्चा
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230126_163303-300x189.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230126_163303-300x189.jpg)
केंद्र सरकारच्या शेती विरोधी धोरणा विरोधात किसान सभेने अंबाजोगाई, परळी, माजलगाव, धारूर आणि वडवणी तहसीलवर ट्रॅक्टर मोर्चा काढला. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेती व्यवसाय संकटात सापडला आहे. जोपर्यंत हमी भावाचा कायदा होत नाही तोपर्यंत संयुक्त किसान मोर्चा देशभवर वेगवेगळे आंदोलन करणार आहे. केंद्र सरकारने संयुक्त किसान मोर्चाला दिलेले लेखी आश्वासनाची आठवण करूण देण्यासाठी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला असल्याचे किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ. अजय बुरांडे यांनी सांगीतले.
संयुक्त किसान मोर्चानी केलेल्या आवाहनानुसार बुधवारी (ता. २५) किसान सभेच्या वतीने अंबाजोगाई, परळी,
माजलगाव, धारूर आणि वडवणीतहसील कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढला. तहसिलवर पहिल्यांदाच ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता. दीडपट हमी भावाचा कायदा, संपूर्ण कर्जमुक्ती, केंद्रीय वीज विधेयकाची वापसी, पेन्शन, पीक विमा देशव्यापी प्रश्नांच्या सोबत राज्यातील, पीक विमा, गायरान व देवस्थान जमिनी, व, अपूर्ण कर्जमुक्ती तसेच बीड जिल्ह्यातील खरीप २०२२ मधील अतिवृष्टी अनुदान, २०२२ मधील खरीप विमा वाटपातील तफावती व अपारदर्शकता.शेतकऱ्यांची बँक खाती होल्ड करणे. पीकविमा, अतिवृष्टी अनुदान, कृषी वीज पुरवठा व शेत मालास हमीभाव या मागण्यांसाठी या संयुक्त किसान मोर्यांने यासारखे प्रश्न केंद्रस्थानी आणण्यासाठी बुधवारी (ता. २५) किसान सभेनी परळी तहसीलवर शेतकऱ्यांचा ट्रॅक्टरसह मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व किसान सभेचे कॉम्रेड रवी देवरवाडे कॉम्रेड जगन्नाथ घाळे कॉम्रेड उत्तरेश्वर इंगोले दिनेश शेप, यांच्यासह यांच्यासह किसान सभेचे नेते आंदोलनात सहभागी झाले होते.