महाराष्ट्र

कुंबेफळ जि.प. शाळेच वैभव वाढले; वैभव पिसाळ जाणार इस्त्रो सहलीला

जिल्हास्तरीय परीक्षेत मिळवले घवघवीत यश

इस्रो व नासाच्या अंतराळ संशोधन संस्थेला भेट देण्यासाठी रविवारी झालेल्या जिल्हास्तरीय अंतिम चाचणी परीक्षेचा निकाल अखेर सीईओ अजित पवार यांच्या स्वाक्षरी नंतर सोमवारी जाहीर करण्यात आला. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळकरी मुला – मुलींना प्रथमच इस्त्रो अंतरिक्ष संस्थेच्या सहलीची संधी मिळत आहे. अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंबेफळ, केंद्र अंबासाखर कारखाना ता.अंबाजोगाईचा विद्यार्थी वैभव चंद्रसेन पिसाळ याची निवड झाली आहे.

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना अंतरिक्ष केंद्र इस्रो श्रीहरीकोटा आंध्रप्रदेश थुंबा स्पेस म्युझियम तिरूवअनंतपुरम, केरळ विश्वेश्वरैय्या इंडस्ट्रियल अँड टेक्नॉलॉजी म्युझियम बेंगलोर, कर्नाटक व नासा या ठिकाणी जाता यावे यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, संशोधन वृत्तीचा विकास व्हावा, विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांच्या कार्यपद्धतीची जवळून ओळख व्हावी, या हेतूने ३३ विद्यार्थ्यांची निवड करण्याचे नियोजन होते.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके व शिक्षणाधिकारी (प्रा.) श्रीकांत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय इस्रो व नासा शैक्षणिक सहल विद्यार्थी निवड चाचणी परीक्षा घेण्यात आली. जिल्हा चाचणीत प्रत्येक तालुक्यातून गुणानुक्रमे तीन विद्यार्थी निवडले गेले. केंद्र तालुकास्तरावर परीक्षा घेण्यात आल्यानंतर या परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा जिल्हास्तरावर रविवार, दिनांक 12 मार्च रोजी घेण्यात आल्या होत्या, या परीक्षेत अंबाजोगाई तालुक्यातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुंबेफळ येथे इयत्ता सातवी वर्गात शिकत असलेला विद्यार्थी वैभव चंद्रसेन पिसाळ याने निवड चाचणी परीक्षेत अंबाजोगाई तालुक्यातून प्रथम येत घवघवीत यश संपादन केले.

इस्रो व नासा येथील सहलीसाठी तो पात्र ठरला आहे. या विद्यार्थ्यास अंबाजोगाईचे गटशिक्षणाधिकारी शेख चाॅंद राजा खाॅंसाहेब, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी नांदुरकर, केंद्रप्रमुख आर.डी. गिरी, केंद्रीय मुख्याध्यापक आवाड, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एम.के.हजारे यांच्यासह जेष्ठ शिक्षक जी.एन.कांबळे, एन.जी.जिरगे, श्रीमती एल.व्ही.जाधव, श्रीमती एम.व्ही.मुंडे, एम.आर.गुळभिले, डी.एम.कसबे, श्रीमती ए.एम.लांब, संतोष गायकवाड, श्रीमती एम.ए.अंबुरे, श्रीमती व्हि.ए.इंगोले, एम.एम.गायकवाड, श्रीमती एम.एम.तोडकर, श्रीमती एम.पी.सरवदे या सर्वांनी मार्गदर्शन केले. त्याच्या निवडीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोर्डे व गावचे सरपंच लिंगेश्वर तोडकर व उपसरपंच प्रमोद भोसले यांनी सदर विद्यार्थ्याचा त्याच्या पालकांसह सत्कार करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker