Uncategorizedमहाराष्ट्र
काळवटी साठवण तलावाची ऊंची वाढवण्यासाठी आता नाव्याने प्रयत्न!

आ. नमिता मुंदडा यांनी घेतला पुढाकार
अंबाजोगाई शहराच्या पाणी पुरवठ्याची अर्धी जबाबदारी उचलणा-या काळवटी साठवण तलावाची ऊंची वाढविण्यासाठी आता आ. नमिता मुंदडा यांनी नव्याने पुढाकार घेतला असून या संदर्भातील जुने अंदाजपत्रक बदलून आता नव्याने अंदाज पत्रक तयार करण्याच्या कामास गती देण्यात आली आहे.
शहर पाणी पुरवठेचा उचलतो अर्धा वाटा
अंबाजोगाई शहरास पाणी पुरवठा करणा-या योजनेतील अर्धा वाटा ऊचलणा-या काळवटी साठवण तलावाची ऊंची वाढवण्याचा प्रस्ताव गेली अनेक वर्षांपासून शासनाकडे प्रलंबित आहे. यापुर्वी या साठवण तलावाची ऊंची वाढवण्यासाठी आ. नमिता मुंदडा यांनी पुढाकार घेतला आहे.

नव्याने अंदाजपत्रक बनवण्याच्या
कामाने घेतली गती
काळवटी तांडा साठवण तलाव उंची वाढवणे चे जुने अंदाजपत्रक व आताच डी एस आर बदलला आहे. त्यामुळे आता नवीन डी एस आर प्रमाणे अंदाजपत्रक बनवण्याचा कामाने गती घेतली असून पुढच्या आठवड्यात हे नवीन अंदाज पत्रक तयार झाले की अंबाजोगाई नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या कडे पाठवले जाईल व रीतसर नंतर शासनाकडे हा प्रस्ताव पाठवला जाईल व तो मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील अशी माहिती आ. नमिता मुंदडा यांनी दिली आहे.
