‘काळवीट’ ओव्हर फ्लो तर ‘मांजरा’च्या घशाला अजूनही कोरडच…!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/09/IMG_20230926_111859-1024x775.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/09/IMG_20230926_111859-1024x775.jpg)
अंबाजोगाई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दोन प्रकल्पांपैकी १५ दलघमी पाणी साठवण क्षमता असलेले काळवीट साठवण तलाव २५ सप्टेंबर रोजी रात्री कोसळलेल्या पावसामुळे ओव्हरफ्लो झाले तर २२४. ०९३ दलघमी पाणी साठवण क्षमता असलेल्या मांजरा धरणाच्या घशाला पडलेली कोरड अजूनही शांत झाली नाही. मांजरा धरण आता शुन्य पातळीच्या वर येण्याचा प्रयत्न करीत आहे.
अंबाजोगाई शहरातील वाढती पाण्याची मागणी लक्षात घेऊन गेली १० वर्षापुर्वी काळवीट साठवण तलाव पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करुन स्वतंत्र योजना सुरु केलेल्या काळवीट साठवण तलावात काल साठवण क्षमतेपेक्षा ही अधिक पाणी जमा झाल्याने हा साठवण तलाव ओव्हर फ्लो झाला आहे.
तर दुसरीकडे अंबाजोगाई शहराला पाणी पुरवठा करण्याचे मुळ स्त्रोत असलेल्या मांजरा धरणात मात्र अजूनही पाणी साठा वाढण्यासाठी म्हणावी तशी सुरुवात झाली नाही.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/image_editor_output_image-1365836168-1692719605484.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/image_editor_output_image-1365836168-1692719605484.jpg)
२२४.०९३ दलघमी पाणी साठवण क्षमता असलेल्या मांजरा धरणातील पाणी साठ्यावर बीड लातूर उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातील शेकडो गावांचा पाणी पुरवठा अवलंबून आहे. यावर्षी मांजरा धरण प्रवण क्षेत्रात म्हणावा तसा पावूस न पडल्यामुळे हे धरण अजूनही शुन्य पातळीच्या खालीच आहे.
आज २६ सप्टेंबर रोजी मिळालेल्या अधिकृत माहिती नुसार सकाळी सात वाजता २२४.०९३ दलघमी पाणी साठवण क्षमता असलेल्या मांजरा धरणात फक्त ९१.३३३ दलघमी पाणी साठा शिल्लक आहे. मांजरा धरणाची जीवंत पाणी साठा साठवण क्षमता१७६.९६३ दलघमी एवढी आहे तर सध्या धरणात फक्त ४४.२०३ दलघमी जीवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. मांजरा धरणाची पर्जन्यमान क्षमता ४७० मीमी एवढी आहे तर धरणक्षेत्रात आज पर्यंत फक्त ५.०० मी पर्जन्य झाले आहे.
मांजरा धरणाच्या कॅचमेंट एरीयामध्ये अजुनही समाधान कारक पाऊस झाला नसल्यामुळे नदी प्रवाहातुन धरणात पाणी जाण्याची प्रक्रिया अद्दाप सुरुच झाली नाही. मांजरा धरणात नदीच्या प्रवाहातुन पाणी येण्याची क्षमता १८.७३४ दलघमी एवढी आहे. यावर्षी फक्त ०.४४१ दलघमी पाणी नदी प्रवाहातुन आले आहे.
आज उद्या मांजरा धरण क्षेत्रात जर चांगला पाऊस झाला तर मांजरा धरण येत्या दोन दिवसांत शुन्य पातळीच्या वर येईल. सध्या धर्मात फक्त २४.९८ टक्के पाणी साठा आहे. हा पाणी साठा २५ टक्क्यांपेक्षा जास्त झाला की मांजरा धरण शुन्य पातळीच्या वर येईल.