महाराष्ट्र

कार्यकर्त्यांच्या गर्दीने आई निवास फुलला; मुंदडा परिवाराचे अभिनंदन करण्यास लोटली गर्दी!

केज विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विजयी झालेल्या आ. नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा आणि नंदकिशोर मुंदडा यांचे अभिनंदन करण्यासाठी आज आई निवासस्थानी केज विधानसभा मतदारसंघातील नागरीकांनी मोठी गर्दी केली.

विजयी मिरवणूकीतही होती मोठी गर्दी!

आ. नमिता मुंदडा यांच्या विजयानंतर काल रात्री अंबाजोगाई शहरातील प्रमुख मार्गावरून मोठी विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत मतदार संघातील हजारो तरुणांनी आपला आनंदोत्सव साजरा केला.

सकाळ पासूनच होती गर्दी!

आज सकाळपासून आ. नमिता मुंदडा यांच्या आई निवासस्थानी मतदार संघातील हजारो कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी आ. नमिता मुंदडा यांच्या सोबतच अक्षय मुंदडा आणि नंदकिशोर मुंदडा यांच्या वैयक्तिक भेटी घेत या सर्वांनी आपला आनंद साजरा केला. यावेळी आपल्या भेटीसाठी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आतिथ्य मुंदडा परिवाराच्या वतीने करण्यात आले.

१ लाख ५५ हजार ६८९ मते घेऊन विजय

केज विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीच्या उमेदवार आ.नमिता मुंदडा या १ लाख १५ हजार ६८९ मते घेऊन विजयी ठरल्या आहेत . आ.नमिता मुंदडा यांनी मागील ५ वर्षांत मतदारसंघात जवळपास २ हजार कोटींची विकासकामे केली. या कामांमुळे सामान्य मतदार या निवडणुकीत आ. नमिता मुंदडा यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिला असल्यामुळे या निवडणुकीत जवळपास ३ हजार पेक्षा अधिक मतांची आघाडी घेऊन नमिता मुंदडा या विजयी झाल्या.

मतदारसंघातील सर्व जनतेचे मानले आभार

केज विधानसभा निवडणुकीत मी, भाजपा महायुतीच्या वतीने उमेदवार होते. या निवडणुकीत आमच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आदरणीय नितीन गडकरी, भाजपा राष्ट्रीय सचिव लोकनेत्या आ.पंकजाताई मुंडे, माजी खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे यांनी प्रचार सभा घेतल्या तसेच भाजपा, महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे सन्माननीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी डोअर-टू-डोअर जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला. तसेच केज विधानसभा मतदारसंघातील जनतेने पुन्हा आम्ही केलेल्या विकासकामांना पुन्हा पसंती दिली. व मतदानरूपी आशीर्वाद दिले. निवडणूक प्रचार प्रक्रिया गतिमान करण्यासाठी मला ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व युवा नेते अक्षयजी मुंदडा यांची भक्कम साथ लाभली. त्यामुळे भाजपा महायुतीच्या विजयासाठी ज्यांनी ज्यांनी मदत, सहकार्य करून आशिर्वाद दिले त्या केज मतदारसंघातील सर्व जनतेचे जाहीर आभार आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी मानले आहेत.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker