कवी दिनकर जोशी घेणार नेपाळ येथील बहुभाषिक कवी संमेलनात सहभाग
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230220_133001-1024x514.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230220_133001-1024x514.jpg)
अंबाजोगाई येथील प्रतिथयश कवी दिनकर जोशी यांना २१ फेब्रुवारी रोजी नेपाळ मधील काठमांडू येथे आयोजित करण्यात आलेल्या “नेपाळ-भारत बहुभाषिक कवि संमेलन” मध्ये आमंत्रित करण्यात आले असून ते या संमेलनात सहभागी होणार आहेत.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230220-WA0080-229x300.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230220-WA0080-229x300.jpg)
अक्षरयात्री प्रतिष्ठान, विटा (भारत) आणि भारतीय राजदूतावास काठमांडू (नेपाळ) यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाचे औचित्य साधून आज मंगळवार, दिनांक 21 फेब्रुवारी रोजी आयोजित नेपाळ – भारत बहुभाषिक कवि संमेलनात निमंत्रित कवी म्हणून पाचारण करण्यात आल्याबद्दल कविवर्य जोशी यांच्या निवडीचे साहित्य वर्तुळ, मिञ परीवार तसेच सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.
पुन्हा एकदा अंबानगरीचा नांवलौकिक व अंबाजोगाईतील साहित्य रसिकांचा आनंद द्विगुणित होईल अशी महत्त्वपूर्ण घटना साहित्य क्षेत्रात या आठवड्यात घडून येत आहे. ते म्हणजे अंबाजोगाईचे प्रख्यात साहित्यिक व कवि दिनकर जोशी यांना आज 21 फेब्रुवारी रोजी अक्षरयात्री प्रतिष्ठान, विटा (भारत) आणि भारतीय राजदूतावास काठमांडू (नेपाळ) यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाचे औचित्य साधून अक्षरयात्रीचे 25 वे रौप्य महोत्सवी साहित्य संमेलन ज्ञानेश्वर मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नेपाळच्या पवित्र भूमीत विश्व संमेलन म्हणून साजरे होत आहे. या आयोजित बहुभाषिक आंतरराष्ट्रीय कवि संमेलनात निमंत्रित कवी म्हणून निवड करून सन्मानपूर्वक निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती अक्षरयात्री प्रतिष्ठानचे कार्यवाह अनिल पवार यांनी दिली आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230220_133118-1024x1015.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230220_133118-1024x1015.jpg)
त्यांचे निवडीचे पत्र राजदूतावास काठमांडू (नेपाळ) यांच्याकडून कविवर्य जोशी यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. या बहुभाषिक आंतरराष्ट्रीय कवि संमेलनात साहित्य, संस्कृती व काव्य या विषयावर मौलिक चिंतन होणार आहे.
नेपाळ – भारत बहुभाषिक कवि संमेलनात निमंत्रित कवी म्हणून पाचारण करण्यात आल्याबद्दल कविवर्य जोशी यांच्या निवडीचे साहित्य वर्तुळ, मिञ परीवार तसेच सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.