कला ही माणसाला चिरकाल जिवंत ठेवते; कुलगुरू डॉ. इंद्रमणी
कला ही माणसाला चिरकाल जिवंत ठेवते असे मत कै. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ इंद्रमणी यांनी व्यक्त केले. लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय कृषी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या युवक महोत्सवात ते बोलत होते.
जसा दीपक चराचरातील अंध:कार नाहीसा करून दशदिशा प्रकाशमान करतो, त्याचबरोबर आपल्या विचार, वाणी आणि करणीने युवकांनी करोडो व्यक्तींच्या जीवनातील अंध:कार दूर केलाय. अशा तरुण तडफदार युवक युवतींना स्वतःचे कलागुण सादर करण्यासाठी आज मिळाले एक हक्काचे व्यासपीठ निमित्त होते युवक महोत्सवाचे. कृषि महाविद्यालय व विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लातूरच्या संयुक्त विद्यमाने आज लातूर येथे भव्य युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सावास उद्घाटक व अध्यक्ष म्हणून लाभले वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.इंद्र मणी, प्रमुख अतिथी म्हणून संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता डॉ उदय खोडके,तर डॉ.संजीव बंटेवाड, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य, कृषि महाविद्यालय, अंबाजोगाई, डॉ.रणजीत चव्हाण, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य पकृव्यव्य महाविद्यालय, चाकूर, डॉ.अच्युत भरोसे, प्रभारी सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य, विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लातूर, डॉ.पुरुषोत्तम झंवर, विद्यार्थी कल्याण अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाची सर्व तयारी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे व त्यांच्या चमुने अल्पवधीतच केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.दिनेशसिंह चौहान यांनी केले, स्वागत गीत गायन कु.विशाखा भोसले हिने केले. समयोचित सूत्रसंचालन डॉ.दयानंद मोरे आणि कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन जिमखाना उपाध्यक्ष डॉ.ज्योती देशमुख यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व परीक्षक, कृषि महाविद्यालय व विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लातूर येथील सर्व प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या महोत्सवात सहभागी स्पर्धक विद्यार्थी, विद्यार्थीनींच्या बहुसंख्य उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढविली.