महाराष्ट्र

कर्करोग व मासिकपाळी दरम्यानची काळजी यावर वर्षभर उपक्रम राबवणार

डॉ. व्यंकटराव डावळे वैद्यकीय प्रतिष्ठानचा उपक्रम

कर्करोग प्रतिबंधक आणि मासिक पाळी दरम्यान घेण्याची काळजी यावर डॉ. व्यंकटराव डावळे वैद्यकीय प्रतिष्ठान वर्षभर मराठवाड्यासह सीमावर्ती भागातील जिल्ह्यातील विविध शाळांच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अरुण बावळे यांनी दिली.

डॉ. व्यंकटराव डावळे यांच्या स्मृती जागवत सामान्य माणसाला मिळणार वैद्यकीय उपचार

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे पहिले अधिष्ठाता डॉ. व्यंकटराव डावळे यांनी केलेल्या वैद्यकीय आणि सामाजिक कार्याची माहिती सामान्य लोकांना व्हावी व त्यांचे नावाने समाजातील सामान्य गरजू लोकांपर्यंत वैद्यकीय सेवा पुरवतात याव्यात यासाठी डॉ. व्यंकटराव डावळे वैद्यकीय प्रतिष्ठानच्या वतीने गेली अनेक वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून कर्करोग निदान व उपचार यासंबंधीची जनजागृती संपुर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे.

मराठवाडा व सीमावर्तीय जिल्हे केंद्रबिंदू!

आता डॉ. व्यंकटराव डावळे वैद्यकीय प्रतिष्ठानच्या वतीने संपुर्ण मराठवाडा आणि सीमावर्ती भागातील जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थिनींनी कर्करोग प्रतिबंधक उपाय योजनासंबंधीची ज्यात गर्भाशयाच्या मुखा चा कर्करोग निदाना साठी पॅप स्मियर, कॉलपोस्कोपी तपासण्या मोफत अथवा अल्प दरात करण्यात येणार आहेत आणि मासिकपाळी दरम्यान घेण्यात यावयाची काळजी या संदर्भात माहिती देण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

डॉ. अरुण डावळे, डॉ. ज्योती बावळे व इतर मान्यवर करणार समुपदेशन

यासर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रख्यात सर्जन व कर्करोग तज्ञ डॉ. अरुण डावळे व प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉ. ज्योति डावळे व डॉ. व्यंकटराव डावळे वैद्यकीय प्रतिष्ठानशी निगडित असलेल्या तज्ञ डॉक्टरांच्या आणि अभ्यासकांच्या माध्यमातून ही जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. व्यंकटराव डावळे वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अरुण डावळे यांनी या “माध्यम” शी बोलताना दिली.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker