महाराष्ट्र

कपडे धुण्यासाठी आई सोबत गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडुन मृत्यू


सध्या नऊरात्राची लगबग सुरू असून पक्ष पंधरवाड्यामध्ये घरातील कपडे धुण्याचा महिलांचा सपाटा सुरू आहे. यातच दोन कुटूंब कपडे धुण्यासाठी गेले असता बारा वर्षाच्या मुलीला वाचविण्यासाठी गेलेल्या वीस वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी 1.00 वाजताच्या दरम्यान घडली आहे. ही घटना अंबासाखर ते लोखंडी सावरगाव महामार्गावर असलेल्या तलावात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


अंबाजोगाई तालुक्यातील अंबासाखर कारखाना ते लोखंडी सावरगाव महामार्गावरील नवीन प्रस्तावित उपप्रादेशिक परिवहन कार्यालय लगत असलेल्या तलावात असलेल्या पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला आहे. अंबासाखर कारखाना परिसरातील दोन कुटुंब कपडे धुण्यासाठी आज दुपारी (दि. 5) रोजी गेले होते.

अश्विनी लहु जाधव (वय 10) ही मुलगी बुडू लागल्यामुळे रोहित परमेश्वर चव्हाण (वय 16 ) या तरुणाने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु तिला वाचविण्याच्या नादात मुलाला स्वतःचा जीव गमवावा लागला आहे. दोन्ही लेकरांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. दरम्यान या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker