Uncategorizedमहाराष्ट्र

ओंकार रापतवार याच्या बॉम म्युजिक स्कुलचे चे ५ नोव्हेंबर ला होणार उद्घाटन


संगीत क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान मिळवून शहरातील संगीतप्रेमी मुलांना पिढीजात संगीत वाद्दासह उच्च तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विकसीत झालेल्या संगीत वाद्यांचे अत्याधुनिक पद्धतीने शिक्षण देणारी बॉम म्युझिक स्कुल या पहिल्या म्युझिक स्कुलचे उद्घाटन ५ नोव्हेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
अल्पावधीतच संगीतातील उच्च शिक्षण घेऊन अंबाजोगाई शहराचे नांव संगीत क्षेत्रात संपुर्ण देशभरात पोहंचवणा-या प्रख्यात संगीतकार ए. आर. रहेमान यांच्या मार्गदर्शनाखाली संगीताचे उच्च शिक्षण घेवून संगीत क्षेत्रात आपली नवी ओळख निर्माण केलेल्या ओंकार सत्येंदु रापतवार याने अंबाजोगाई शहरात ही अत्याधुनिक संगीत सृकुल सुरु करण्याचे धाडस केले


येथील छत्रपती संभाजी राजे चौकातील सोनवणे कुशन शेजारी भव्य इमारतीत उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक बॉम म्युझिक स्कुलचे उद्घाटन ५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी आमदार संजय भाऊ दौंड, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, माजी उपनगराध्यक्ष मनोज लंकेला, ज्ञानप्रबोधिनी चे प्रसाद दादा चिक्षे, प्रख्यात संगीत शिक्षक तथा तबला अकादमीचे संचालक प्रकाश बोरगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ओंकार रापतवार यांची आई कल्पना आणि आजी चंद्रकला यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयांचे प्राचार्य, इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे प्राचार्य, संगीत विद्यालयाचे संचालक, डॉक्टर, प्राध्यापक, विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, शिक्षक, पत्रकार, वकील, व्यावसायिक आणि सर्व पालकांनी अंबाजोगाई शहरात सुरू करण्यात येणाऱ्या या नव्या उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहुन आशिर्वाद द्दावेत असे आवाहन संचालक ओंकार सत्येंदु रापतवार, वैभवी सत्येंदु रापतवार आणि रापतवार परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker