महाराष्ट्र
एमपीएससी परीक्षेतील सोनाली मात्रेत हीचे यश बीड जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ; पंकजा मुंडे
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/image_editor_output_image1488290605-1677664616584.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/image_editor_output_image1488290605-1677664616584.jpg)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दैदीप्यमान यश मिळविणाऱ्या माजलगांवच्या सोनाली मात्रे हिच भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी अभिनंदन केलं आहे. सोनालीचं यश हे जिल्हयासाठी अभिमानास्पद आणि मान उंचावणारं आहे अशा शब्दांत त्यांनी तिचं कौतुक केलं आहे.
यासंदर्भात पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करून सोनालीच्या यशाचं कौतुक केलं आहे.राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत माजलगाव ता. इरला मजला येथील शेतकरी श्री. अर्जुन मात्रे यांची कन्या कु.सोनाली मात्रे ही महिलांमधून राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन. सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत तिने मिळविलेले हे यश नक्कीच अभिमानास्पद आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
••••