विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २० तारखेला मतदान होणार आहे. या निवडणुकीत प्रथमच मतदानाचा हक्क बजावणा-या तरुणांची संख्या मोठी आहे. सुगाव येथील अशाच एका नवमतदाराने आपले नाव मतदान यादीत आहे का नाही याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्याला आपले नाव सुगाव मतदार यादीत न सापडतात ते पूस गावच्या मतदार यादीत सापडले आहे. निवडणुक आयोग मतदान यादीत नाव दाखल करुन घेतांना सर्व पुरावे सोबत घेते, मात्र असे असतानाही एका गावच्या मतदारांचे नाव दुसऱ्या गावच्या मतदान यादीत येतेच असे असा सवाल आता पडला आहे.
अनेक नवतरुणांनी विधानसभा निवडणूकीसाठी नवीन मतदार यादीत ऑनलाईन नोंदनी केली आहे.मात्र नवीन मतदार यादीत घोळात घोळ झाला असुन सुगावच्या तरूणाचे नाव परगावच्या मतदार यादीत नाव आल्यामुळे स्वतःच्या गावत मतदान न करता परगावला जाऊन मतदार यादी प्रमाणे मतदान करण्याची वेळ आल्यामुळे नवीन मतदार संभ्रमात आहेत. पहिल्यांदाच मतदार यादीत नाव आल्याचा आनंद तरुणांच्या चेहऱ्यावर पहायला मिळत आसला तरी तो हक्क दुसऱ्याच्या गावात बजावता येणार आसल्याने कभी खुशी कभी गम अशी स्थिती निर्माण झाली आहे.
विधानसभा निवडणुकीची सध्या जोरात रणधुमाळी सुरु आहे. मतदानाचा हक्क मिळावा यासाठी नव तरुणांनी आपले नाव ऑनलाईन नोंदवले आहे. त्यामुळे आपल्याला मतदानाचा हक्क पहिल्यांदा मिळणार असल्याचा आनंद नवतरुणाच्या चेहऱ्यावर दिसत आसला तरी मतदार यादीत घोळचघोळ झाल्याने तरुणांची भ्रमनीराशा झाली आहे.परळी मतदारसंघातील व अंबाजोगाई तालुक्यातील सुगाव येथील तरुण साईश्वर दिलीप अरसुळ यांने ऑगस्ट महिन्यात मतदानाचा हक्क मिळावा या साठी ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी केली आहे. विधानसभा निवडणूकीसाठी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी साईश्वर याने ऑनलाईन मतदान यादी पाहिली आसता त्याचे नाव परळी मतदारसंघातील पुस या गावातील मतदान यादीत नाव आल्याचे निदर्शनात आले आहे.
विधानसभा मतदारसंघ क्रमांक २२३,भाग क्रमांक
२४६पुस,मतदान केंद्राचा पत्ता हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुस आसा उल्लेख आला आहे. परळी मतदारसंघात सुगाव व पुस येत असले तरी सुगाव ते पुस हा २० कि.मी आंतर पार करुन दुसऱ्या गावच्या मतदार यादीत नाव आल्यामुळे स्वतःच्या गावात मतदान न करता दुसऱ्या जाऊन मतदार यादी प्रमाणे मतदान करण्याची वेळ तरुणावर आली आहे. नवीन मतदार यादीत घोळात घोळ झाल्याने नवीन मतदार संभ्रमात आहेत.पहिल्यांदाच मतदार यादीत नाव आल्याचा व मतदान करण्याचा हक्क मिळाल्याचा आनंद तरुणांच्या चेहऱ्यावर पहायला मिळत असलातरी तो हक्क दुसऱ्याच्या गावात बजावता येणार आसल्याने कभी खुशी कभी गम अशी स्थिती तरुणाची झाली आहे.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.