अंबाजोगाईबीड

ऍथलॅटिक्स चाचणीला मोठा प्रतिसाद

अंबाजोगाई (प्रतिनिधी ) बीड जिल्हा अॅथेलॅटिक्स संघटना आणि गोल्डन स्पोर्टस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा अॅथलॅटिक्स चाचणी स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळला .
या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार संजय दौंड यांनी झंडी दाखवून केले . प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी उपनगराध्यक्ष बबन भैय्या लोमटे , राणजित चाचा लोमटे, दत्ता सरवदे,जेष्ठ क्रीडा मार्गदर्शक शारदाप्रसाद साहू , शिवकुमार निर्मळे, अविनाश बारगजे , श्री . जोगदंड, शेख,तालुका क्रीडास्पर्धा समन्वयक दत्ता देवकते यांची प्रमुख उपस्थिती होती .
सुरुवातीला मान्यवरांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला . श्रीफळ वाढवून क्रीडा साहित्याचे पूजन केले .
चांगले आरोग्य हीच मोठी संपत्ती असल्याचे संजय दौंड यांनी सांगितले . राजकिशोर मोदी यांनी क्रीडा संस्कृती जोपासण्याचे अवाहन केले . क्रीडा संकुलासाठी सहकार्य करण्याचे अश्वासन पृथ्वीराज साठे यांनी दिले .
प्रारंभी शिवकुमार निर्मळे यांनी प्रास्ताविक केले .
दिनेश पवार , अंगद केंद्रे, प्रविण देशमुख यांनी पाहुण्यांचे स्वागत केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू सरवदे यांनी केले .
शंभर मीटर धावणे स्पर्धेचा प्रारंभ मान्यवरांनी हिरवी झंडी दाखवून केला . यावेळी धावणे, फेकी, उड्या
या मैदानी क्रीडा चाचणी स्पर्धा दिवसभर घेण्यात आल्या .

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker