महाराष्ट्र

ऍड. अनंत जगतकर यांची कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी; लवकरच निर्णय

तुतारी का कमळ लवकरच घेणार निर्णय

माझ्या कडे केज मतदार संघाच्या विकासाचे व्हिजन असताना व मी बीड जिह्यातील काँग्रेस नेतृत्वासह वरीष्ठ नेत्याकडे पाठपुरावा करूनही माझ्या उमेदवारी साठी त्यांनी प्रयत्न केले नाहीत असा आरोप करून आपण काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत आहोत अशी घोषणा काँग्रेसचे जेष्ठ नेते ऍड. अनंतराव जगतकर यांनी केली.

कॉंग्रेसच्या फुटी नंतर वाढवली कॉंग्रेस!

या वेळी बोलताना ऍड अनंतराव जगतकर म्हणाले की, काँग्रेसचे विभागाजन झालं त्यावेळी काँग्रेस कडे चिट पाखरू राहील नव्हतं. त्यावेळी आम्ही केवळ चार-पाच जणांनी पुनर्बांधनी केली. १९८५ ला विधानसभा तिकीट मिळालं मात्र अंतर्गत बंडाळी मुळे पराभव पत्करावा लागला. पूर्वी गॅस एजन्सी साठी अर्ज केला होता. तत्कालीन तहसीलदार पोफळकर यांनी बोलावून मला एजन्सी ला प्रवृत्त केलं. १९८६ ला पडव्याच्या शुभ प्रसंगी मी एजन्सी चालू केली.

मतदार संघाचा मास्टर प्लॅन तयार!

मी काँग्रेसचा प्रदेश प्रतिनिधी आहे. माझ्या कडे केज मतदार संघाच्या विकासाचा मास्टर प्लॅन तयार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक लढवण्या संदर्भात कॉंग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री अशोक पाटील यांचा कॉल आला होता. ऑगस्ट मध्ये पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मला लातूर येथे विचारणा केली. यानंतर मी मतदारसंघाचा सर्व्हे केला. या सर्व्हे मध्ये मला उत्तम प्रतिसाद मिळाल्यावर मी उमेदवारी साठी तयारी केली.

उमेदवारी मिळाली नाही म्हणून…

उमेदवारी मिळवण्यासाठी खा. शरदचंद्र पवार साहेबाना भेटलो. महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाला बीड जिल्ह्यात एक तरी जागा सोडा म्हणून मागणी केली. तुमच्या नेत्याला बोलायला सांगा असे त्यांनी सांगितले. मी नेत्यांना हा निरोप दिला, केज साठी आग्रह धरा म्हणून मागणी केली. मात्र नेत्यांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. कॉंग्रेसचे नेते खुशाल आहेत, बीड जिल्ह्यात काँग्रेस संपुष्टात आला आहे. माझ्या सारखा व्यक्ती प्रवाहात राहिला मात्र काँग्रेस पक्षात संपुर्ण आयुष्य घालवून ही राजकीय भवितव्य नाही. उलट हा टिंगल टवाळीचा पक्ष झाला आहे.

निवडणुकीपुर्वी “ही” घेतली होती भुमिका

विधानसभा निवडणुका लागण्या पुर्वीही कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी चे सदस्य असलेले ऍड. अनंतराव जगतकर यांनी एक पत्रपरीषद घेवून केज विधानसभा मतदारसंघातील सर्व ललित समाजाने एकत्र होवून दलित समाजातील उमेदवाराच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन केले होते. या आवाहनाला त्यावेळी बरा प्रतिसाद ही मिळाला होता. या पार्श्वभूमीवर आता ते नेमकी कोणती भुमिका घेतात हे पहाणे महत्वाचे आहे.

पक्षश्रेष्ठींकडे पाठवणार राजीनामा

यासर्व पार्श्वभूमीवर आता कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. पुढे कोणत्या पक्षाला पाठिंब्या द्यायच्या याचा निर्णय नंतर घेईल. यावेळी त्यांनी खा. रजनीताई पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष तोफ डागत त्यांनी आज पर्यंत काँग्रेस पक्षाला पोषक परस्थिती निर्माण केलेली नाही. माझ्या उमेदवारी साठी काडीचेही प्रयत्न केलेले नाहीत. त्यांनी प्रयत्न केले असते तर केज मतदार संघ काँग्रेस पक्षाला सुटला असता मात्र ते प्रयत्न झाले नाहीत. म्हणून मी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत आहे. आपण उद्या आपला राजीनामा पक्ष श्रेष्ठींकडे पाठवत आसल्याचे त्यांनी सांगितले.

कमळ की तुतारी?

ऍड. अनंत जगतकर हे आपला राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठवल्यानंतर पुढील काळात काय करायचे? कोणती राजकीय भुमिका घ्यायची हे लवकरच ठरवणार आहेत. या निवडणुकीच्या धामधुमीत ते आता आपल्या हातात “कमळ” घेणार की “तुतारी” हे लवकरच स्पष्ट होईल.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker