Uncategorized

ऊस तोडणी साठी मंजूर घेवून जाणारा ट्रॅक्टर पलटला; १ ठार, १० जखमी


कर्नाटक येथे ऊस तोडणी साठी जाणाऱ्या ऊसतोड टोळीच्या ट्रॅक्टरची जोडपिन तुटल्यामुळे ट्रॅक्टर घाटात पलटी होऊन त्यात एका मुलाचा मृत्यू झाला असून बारा जण जखमी झाले आहेत.

तालुक्यातील मौजे येल्डा येथील ऊसतोड मुकादम •अमर उत्तर सुरवसे हे आज पहाटे कर्नाटक राज्यातील जम कारखाना येथे टॅक्टर क्र.mh 13 j2299 ने ऊस तोडणीसाठी आठ कोयत्याची टोळी एक ट्रॅक्टर व दोन ट्रॉली भरून महिला पुरुष बच्चे कंपनी व खाद्य सामान भरून कारखान्याकडे पाठवत असताना टोळी आंबेजोगाई कडे येत असताना बुटेनाच्या घाटात चढतांना खराब रस्त्यामुळे ट्रॅक्टरला झटका बसल्याने हेड व ट्रॉलीला जॉईन करणारे पिन तुटून ट्रॉली उताराच्या दिशेने खाली घसरत जाऊ लागले काही मुलांनी दगड टाकून अडवण्याचा प्रयत्न केला मात्र ट्रॉली थांबली नाही बाजुला जाऊन पलटी झाली यात बसलेले फेकले गेले गंभीर जखमी झाले ही घटना मॉर्निंग वॉक साठी गेलेले पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार मिलिंद गायकवाड, शेख अनवर, नाना गायकवाड, सुनील कांबळे, सचिन अंजान पीएसआय ज्ञानेश्वर गव्हाणे, पोलीस जयदीप कसबे, न, प, चे कर्मचारी रमेश सोनकांबळे व इतरांनी जखमींना ट्रॉली खालील काढून उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठवले.
या अपघातात रणजीत अमोल कांबळे वय अकरा वर्ष याचा जागेवरच मृत्यू झाला असूनआशा बाळू माळी 22, रुबीना जलील सय्यद20, अलिदा जलील सय्यद44, दादाराव धनु गायकवाड 34, सुधाकर दिगंबर गवारे 35, सुरेखा सुधाकर गवारे 35, मयत रंजीत अमोल कांबळे 11, उषा धनंजय गायकवाड 18, ललिता दशरथ35, कोमल अमोल कांबळे 18, धुराजी माणिक मगर65, सारिका महादेव मगर30, सोनपेठ गायकवाड मंगेश दशरथ तिटे हे जख्मी झाले आहेत. यात दोन महीला गंभीर आहेत. येल्डा व सोनपेठ येथील आहेत.
ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांना नायब तहसीलदार मिलिंद गायकवाड यांनी जेसीबी व अंबुलन्स तात्काळ पाठवण्याचे व्यवस्था करण्याचे सांगितले मुंदडा यांनी सारंग पुजारीमार्फत जेसीबीची व्यवस्था करत रुग्णालयातून 108 सह खाजगी रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवून स्वतः स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हजर होऊन रुग्णालयातील स्टाफ, अस्थिरोग विभाग प्रमुख डॉक्टर दीपक लामतुरे, सर्जरी विभाग प्रमुख नितीन चाठे, डॉ. रेड्डी यांच्यासह सर्व रुग्णालयीन व्यवस्था तयार केल्यामुळे जखमींना तात्काळ उपचार होण्यास मदत झाली.
ट्रॅक्टर चालक सिध्दु यांने पुरुष बसलेली एक ट्रॉली वाडी येथील डोंगर माथ्यावर थांबून महिला व मुले असलेले ट्रॉली घेऊन घाटपार करण्यासाठी निघाला ट्रॅक्टर घाटात आल्यावर त्याने मधील बसलेल्यांना उतरण्याची विनंती केली मात्र कोणीच ट्रॅक्टरट्रॉली मधून खाली उतरले नाही जर ड्रायव्हरच्या ऐकले असते तर एवढी मोठी घटना कळली असती.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker