उन्हाळ्यात थंडाई देणा-या टरबुजाला अंबाजोगाईत मोठ्या प्रमाणावर मागणी


५ पासून १०० रुपयांचा पर्यंत टरबूज उपलब्ध!
उन्हाची तीव्रता वाढत असताना अंबाजोगाई सह परिसरात मोठ्या प्रमाणात टरबुजांची आवक वाढली असून अगदीच ५ रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंतच्या दराने जागोजागी टरबुजांची विक्री होत असताना दिसत आहे. शहरात महत्वाच्या ठिकाणी टरबुज विक्रीची दुकाने उघडली आहेत. असे असले तरी अंबाजोगाईत आजुबाजुच्या ग्रामीण भागातील शेतकरी वाहनांमधुन थेट टरबुजांची विक्री करीत आहेत.


शहर व इतरत्र टरबुजाची विक्री वाढली आहे अशा कडक उन्हाळ्यात टरबुजांनी शरीराला थंडपणा मिळतो. उन्हाळ्यात ज्येष्ठ नागरिकांपासून ते लहान बालकांपर्यंत सर्वांची पहिली पसंती टरबुजाला असते त्यामुळेच टरबुज विक्री शहर व परिसरात मोठया प्रमाणात असते टरबुजाचे दर हे त्यांच्या आकारावरून ठरवले जात आहेत. काही दुकानावर ठिकाणी किलोच्या दराने टरबुज विकले जात आहेत. परंतु त्यासाठी गि-हाईक अत्यल्प असल्याचे दिसून येते नगा प्रमाणेच खरेदी करण्याची ग्राहकाची तयारी असल्याने छोटया आकारा पासून ते मोठ्या आकारापर्यंतचे टरबुजास विशेष मागणी असल्याचे दिसत आहे ग्रामीण भागाहून टरबुज वाहनामध्ये आणून शहरात विकले जात आहेत. अगदी पाच रुपयापासून होतो. परिणामी शंभर रुपयांपर्यंतचे विकले जात आहेत.
AM G


छोटे शेतकरी दुचाकी, तीन चाकी वाहनांमधुन टरबुज विक्रीसाठी बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. तर मोठे शेतकरी आणि मोठ्या वाहना मधुन टरबुजाची मोठ्या प्रमाणात आवक करीत आहेत साधारणपणे शहरात मंगळवार, शुक्रवार, रविवार या दिवशी भरणाऱ्या आठवडी बाजारातून टरबुजांची मोठी विक्री होत असल्याने तसंच मंडीबाजार, गुरूवार पेठ, शिवाजी महाराज चौक, स्वा. सावरकर चौक, अण्णाभाऊ साठे चौक सह इतरत्र टरबुजाची आवक मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.