उदय निरगुडकर यांचे २२ ऑक्टोबर रोजी अंबाजोगाईत व्याख्यान
प्रख्यात पत्रकार-लेखक उदय निरगुडकर यांचे आज २२ ऑक्टोबर रोजी “विकसीत भारतासाठी महाराष्ट्राचे योगदान” या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील नगर परिषदेच्या आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात सायंकाळी ४ वाजता हे व्याख्यान होणार असून भारतीय शिक्षण प्रसारक संस्था आणि साहित्य निकेतन ग्रंथालयाच्या वतीने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
उदय निरगुडकर यांनी दोन दशकांहून अधिक काळ शैक्षणिक क्षेत्र, पायाभूत सुविधा, व्यवस्थापन कौशल्य, आर्थिक क्षेत्र आणि आय टी कंपनीत आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्वाच्या पदावर काम केले आहे.
झी 24 तास, न्यूज 18 लोकमत या लोकप्रिय वाहिन्यांचे तसेच DNA या वृत्तपत्राचे माजी संपादक, व्याख्याते, लेखक म्हणून ते सर्व परिचित आहेत.