इस्लामपुर येथील २८ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बालाजी सुतार
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/01/img_20240116_1349206320585813423238807-300x274.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/01/img_20240116_1349206320585813423238807-300x274.jpg)
इस्लामपुर येथील २८ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बालाजी सुतार यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा इस्लामपूर व राजारामबापू पाटील ज्ञानप्रबोधिनी इस्लामपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या २८ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अंबाजोगाई येथील ज्येष्ठ साहित्यिक बालाजी सुतार यांची निवड करण्यात आल्याची घोषणा संयोजकांनी नुकतीच केली आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील आडस येथील मुळ रहिवासी असलेले बालाजी सुतार यांनी वीस वर्षापुर्वी प्रख्यात साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या “कोसला” कादंबरीच्या आधारीत एक लेख दस्तुरखुद्द नेमाडे यांना लिहीन पाठवल्यानंतर नेमाडे यांनी त्यांच्या लिखाणाचे कौतुक करणारे पत्र बालाजी सुतार यांना पाठवल्यानंतर बालाजी सुतार हे सर्वप्रथम चर्चेत आले होते. यानंतर बालाजी सुतार यांनी मराठी साहित्य क्षेत्रात विपुल लिखाण केले व ते वाचकांच्या पसंतीस ही उतरले.
अत्यंत कमी वयात आशय समृध्द आणि -हदयस्पर्शी लिखाणामुळे साहित्याची परिभाषा बदलण्याचा प्रयत्न करणारा नव्या पिढीतील एक लेखक म्हणून बालाजी सुतार यांच्याकडे पाहिल्या जाते. मागील काही वर्षांपासून बालाजी सुतार यांनी लिहिलेल्या “गावकथा” या नाटकाने तर साहित्य आणि नाट्य क्षेत्रात एक नवी पाऊलवाट निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
बालाजी सुतार हे नव्या पिढीतील वेगळ्या धाटणीचे लेखक आहेत. आपल्या स्वतंत्र लेखन शैलीमुळे ते अल्पावधीतच मराठी साहित्य क्षेत्रात ते सर्वत्र ओळखल्या जावू लागले आहेत. मराठी साहित्य विश्वात अत्यंत कमी वयात त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. बालाजी सुतार यांची ही निवड अंबाजोगाईचा बहुमान वाढवणारा आहे. सदरील निवडीबद्दल त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.