पाटोदा येथून अंबाजोगाई शहरात निवडणूक ड्युटी साठी आलेल्या मुकुंद भालेराव नामक कर्मचाऱ्याचा ड्युटी संपुन केज येथे मतदान यंत्र जमा करत असताना ह्रदय विकाराचा तीव्र झटका आल्याने स्वा रा ती वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू होण्यापूर्वी मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे घडली.
या विषयी प्राप्त माहिती अशी की, अहिल्या नगर (अहमदनगर) जिल्हा श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगांव येथील रहिवासी व पाटोदा तालुक्यातील कारेगाव येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले मुकुंद गुलाबराव भालेराव ( वय ५६ ) या कर्मचाऱ्याने आपणास शुगर बी पी चा त्रास आसल्याने आपली निवडणूक ड्युटी रद्द करावी या साठी प्रयत्न केले होते तरीही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची ड्युटी रद्द न केल्याने त्यांना काल २० नोव्हेंम्बर रोजी केज मतदार संघातील अंबाजोगाई शहरात असलेल्या १२९ क्रमांकाच्या
मतदान केंद्रावर ड्युटी साठी यावे लागले होते.
दिवसभर त्यांनी या मतदान केंद्रावर ड्युटी केल्या नंतर मतदान यंत्र जमा करण्या साठी ते काल रात्री केजला गेले, मतदान यंत्र जमा करत असतानाच दिवस भरातील ताण तणावा मुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्या मुळे केज येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले त्या ठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्या नंतर तेथील डॉक्टरांनी त्यांना अंबाजोगाई ला हलवण्याचा सल्ला दिला. भालेराव यांना अंबाजोगाई येथील स्वा रा ती रुग्णालयात आणल्या नंतर आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्राण ज्योत मालवल्याचे येथील डॉक्टरांनी घोषित केले.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.