ठळक बातम्या

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. नवनाथ घुगे यांची निवड

अंबाजोगाई (प्रतिनिधी)–
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अंबाजोगाई शाखेचे अध्यक्ष म्हणून येथील प्रख्यात -हदयरोग तज्ञ डॉ. नवनाथ घुगे यांची तर जॉईंट सेक्रेटरी म्हणून डॉ. निलेश तोष्णीवाल यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
येथील कृष्णाजी हॉटेल च्या फंक्शन हॉलमध्ये काल इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांची नवीन अध्यक्ष निवडीसाठी बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत डॉ. नवनाथ घुगे यांचे नाव अध्यक्षपदासाठी सर्वानुमते मान्य करण्यात आले.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष डॉ. राजेश इंगोले यांनी कार्यबाहुल्यामुळे अध्यक्षपदाची जबाबदारी इतर सदस्यांकडे द्दावी या केलेल्या मागणीचा विचार करून अध्यक्षपदी डॉ. नवनाथ घुगे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. डॉ. नवनाथ घुगे हे प्रसिद्ध -हदयविकार तज्ञ असून गेली वीस एक वर्षापासून त्यांचा वैद्यकीय व्यवसायासोबतच सामाजिक कार्यात चा़गला वावर आहे. डॉ. निलेश तोष्णीवाल हे प्रख्यात अस्थिरोग तज्ञ म्हणून शहरात कार्यरत आहेत.

आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत सामान्य लोकांना उपयोगी पडतील असे अनेक सामाजिक उपक्रम आपण इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून राबवु असा विश्वास व्यक्त केला आहे.
डॉ. नवनाथ घुगे यांच्या निवडीबद्दल त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker