महाराष्ट्र

आ. नमिता मुंदडा यांच्या तारांकीत प्रश्नांमुळे शेतकऱ्यांचे प्रश्न लागले मार्गी

शेतकऱ्यांना ठिबक, तुषार सिंचनचे थकीत अनुदान मिळणार
शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना अन्नधान्य ऐवजी अनुदान थेट खात्यावर मिळणार

अंबाजोगाई : केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी अधिवेशनातून उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नांमुळे शेतकऱ्यांचे दोन महात्वाचे प्रश्न मार्गी लागले आहेत. ठिबक, तुषार संचाचे थकीत अनुदान शेतकऱ्यांना देण्याविषयी शासनाने आदेश निर्गमित केले आहेत. तसेच, केशरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना यापुढे अन्नधान्याऐवजी थेट अनुदान मिळणार आहे.

विधीमंडळातील सर्वात सक्रीय महिला आमदारांपैकी एक म्हणून आ. नमिता मुंदडा ओळखल्या जातात. आजवर मतदार संघातील विविध प्रश्न त्यांनी विधीमंडळात मांडून निकाली काढले आहेत तर अनेक प्रश्नांचा पाठपुरावा अद्यापही सुरु आहे. मागील काही अधिवेशनात आ. मुंदडा यांनी शेतकऱ्यांचे ठिबक आणि तुषार संचाचे अनुदान निधीअभावी थकल्याबाबत आणि शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना अन्नधान्य ऐवजी अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याविषयी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. शासनाने या दोन्ही प्रश्नांची दखल घेत शेतकऱ्यांच्या सोयीचे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार, राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत ठिबक, तुषार संचाचे निधीअभावी प्रलंबित राहिलेले लाभार्थी शेतकऱ्यांचे अनुदान देण्यासाठी निधीची तरतूद केली आहे. तर, बीडसह राज्यातील १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना जानेवारी २०२३ पासून प्रती महिना अन्नधान्याऐवजी रोख रकमेचे थेट हस्तांतरण शेतकऱ्यांना करण्याबाबतचा शासन आदेश निर्गमित करण्यात आला आहे. आ. मुंदडा यांच्या तारांकित प्रश्नानंतर मार्गी निघालेल्या या दोन्ही निर्णयांचा लाभ बीडसह राज्यातील हजारो शेतकऱ्यांना होणार आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker