१० दिवसांच्या विपश्यना नंतर आ. धनंजय मुंडे आता सक्रिय झाले असून आज स्व. गोपीनाथराव मुंडे यांचा ११ वा स्मृती दिन असून ते मुंडे साहेबांच्या समाधीस्थळावर जावून त्यांनी साहेबांच्या समाधीस्थळी माथा टेकवून त्यांनी आपल्या कामकाजाला सुरुवात केली.
१० दिवसांच्या विपश्यना नंतर माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी आज माजी आमदार तथा भाजपचे नेते स्वर्गीय आर. टी. जिजा देशमुख, परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन गोविंद फड यांच्या आई आणि अंगरक्षक सोपान चाटे यांचे बंधु काशिनाथ चाटे यांच्या निधनामुळे त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या स्मृतीस आदरांजली अर्पण करत तीन ही कुटुंबीयांचे सांत्वन केले.
स्व. आर. टी. देशमुख यांचे एका कार अपघातात लातूर जिल्ह्यातून परतत असताना दुर्दैवी निधन झाले होते. मात्र त्यावेळी धनंजय मुंडे हे विपश्यना केंद्रात असल्याने अंत्यविधिस उपस्थित नव्हते.
आ. धनंजय मुंडे यांनी देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. आ. धनंजय यांनी जिजा यांचे पुत्र रोहीत यांची गळा भेट घेतली तेंव्हा त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.
आर. टी. देशमुख यांनी स्व. खा. गोपीनाथराव मुंडे तसेच स्व. पंडित अण्णा मुंडे यांच्या सोबत अगदी तळागाळातील लोकांना सोबत घेऊन काम केले होते.
जीजांचे अकाली निधन ही देशमुख कुटुंबाइतकीच मुंडे कुटुंबाची सुद्धा हानी असून आता ही हानी कधीही भरून निघणार नाही अशा शब्दात आ. धनंजय मुंडे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यावेळी आरटी जिजा यांचे ज्येष्ठ बंधू एच. टी. देशमुख, एम.टी देशमुख, जे. टी. देशमुख, पुत्र रोहित देशमुख, राहुल देशमुख, अभिजित देशमुख यांसह देशमुख कुटुंबीय तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके, माणिक फड, रामेश्वर मुंडे यांसह आदी उपस्थित होते.
आ. धनंजय मुंडे यांनी त्यांचे सहकारी तथा परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ॲड. गोविंदराव फड तसेच मुंडे यांचे अंगरक्षक सोपान चाटे यांच्या कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेतली.
ॲड. गोविंदराव फड यांच्या मातोश्री स्व. कौशल्याबाई फड यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले होते. आज धर्मापुरी येथील त्यांच्या निवासस्थानी माजी आ. संजय दौंड यांच्या समवेत भेट देत आ. धनंजय मुंडे यांनी फड कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके, माणिकभाऊ फड व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. धनंजय मुंडे यांचे अनेक वर्षांपासून अंगरक्षक असलेल्या सोपान चाटे यांचे बंधू काशिनाथ चाटे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले होते. आज डोंगर पिंपळा ता. गंगाखेड येथील चाटे यांच्या निवासस्थानी भेट देऊन चाटे कुटुंबीयांचे त्यांनी सांत्वन करत धीर दिला. यावेळी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
आज गोपिनाथ गडावर झाले नतमस्तक!
आ. धनंजय मुंडे हे १० दिवसांच्या विपश्यना नंतर परत आल्यावर प्रचंड आत्मविश्वासाने परळी मतदारसंघात फिरताना दिसून येत आहेत. आज लोकनेते स्व. गोपिनाथराव मुंडे यांच्या गोपीनाथ गडावरील समाधी स्थळी त्यांनी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्या भगिनी राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री ना. पंकजा मुंडे, माजी खा. डॉ. सौ. प्रितम मुंडे, ऍड. यशश्री मुंडे, काकू आदरणीय प्रज्ञाताई मुंडे व त्यांच्या परीवारातील इतर सदस्य व गोपीनाथराव मुंडे यांच्यावर प्रेम करणारे हजारो अनुयायांनी समाधीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.