आधुनिक कंसमामा; परळीत धारधार शस्त्राने मामाने केला भाच्चाचा खुन!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/09/IMG_20220911_164553.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/09/IMG_20220911_164553.jpg)
कौटुंबिक वादातून मामाने चार वर्षीय चिमुकल्या भाचाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना परळी तालुक्यातील नागापूर कॅम्प येथे आज रविवारी (दि. ११) पहाटेच्या सुमारास घडली. परळी ग्रामीण पोलिसांनी क्रूरकर्मा मामाला ताब्यात घेतले असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे.
कुमार कार्तिक विकास करंजकर (वय ०४, रा. लाडेगाव, ता. केज) असे त्या दुर्दैवी मयत चिमुकल्याचे नाव आहे. त्याचा मामा सानिक लक्ष्मण चिमणकर (वय २७, रा. नागापूर) हा कौटुंबिक कारणास्तव त्रास देत असल्याने त्याची समजूत घालण्यासाठी कुमार कार्तिकला घेऊन त्याची आई सुरेखा विकास करंजकर ही शनिवारी माहेरी आली होती. रात्री सुरेखाने भावाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. त्यातून नंतर बहिण-भावातच मोठा वाद झाला. त्यानंतर संतापलेल्या सानिकने रविवारी पहाटेच्या सुमारास भाचा कुमार कार्तिकच्या गळ्यावर आणि मानेवर धारदार शस्त्राने वारकेले. कार्तिकचा आरडाओरडा ऐकून सुरेखा धावत आली. मामाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कार्तिकला घेऊन ती परळी, अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात व त्यानंतर लातूरच्या रुग्णालयात गेली. परंतु, कार्तिक वाचू शकला नाही. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अपर अधीक्षक कविता नेरकर, परळी ग्रामीणचे ठाणेप्रमुख मारोती मुंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने आरोपी सानिक चिमनकर याला ताब्यात घेतले असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे.
▪️लग्नासाठी धरला होता आग्रह
———————————–
सुरांनी दिलेल्या माहितनुसार, सानिकने त्याचे लग्न लावून द्या असा आग्रह कुटुंबीयांकडे धरला होता. त्यासाठी तो बहिणीला सतत भांडत असे अशी माहिती आहे. तसेच, सानिकवर मानसोपचार तज्ञाकडून उपचार सुरु होते अशीही माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, पोलीस तपास सुरु असून त्यानंतरचा या घात्नीमागचे खरे कारण समोर येऊ शकणार आहे.