Uncategorizedमहाराष्ट्र

आज २६ सप्टे.अंबाजोगाई परिसरात होणार गडगडाटासह जोराचा पाऊस!

हवामान विभागाने नोंदवला अंदाज

अंबाजोगाई शहर आणि परिसरात आज २६ सप्टेंबर रोजी गडगडाटासह जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने नोंदवला आहे. भारतीय हवामान विभागाने नोंदवलेल्या या अंदाजात दखल गुगल ने घेतली आहे.


अंबाजोगाई शहर आणि परिसरासह मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत यावर्षी सुरुवाती पासूनच चकवा देणा-या पावसाने परतीच्या पावसात जोरदार मुसंडी मारण्यास सुरुवात केली आहे. या आठवड्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आणि दोनच दिवसांपूर्वी मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत चांगला पाऊस झाला.

आता भारतीय हवामान विभागाने नोंदवलेल्या अंदाजाप्रमाणे २६ सप्टेंबर रोजी गडगडाटासह जोरदार पाऊस असल्याचे सांगितले आहे. या हवामान अंदाजानुसार २५ सप्टेंबरच्या मध्यरात्री १ वाजेपासून या पावसास सुरुवात होणार असून पहाटे ६ वाजेपर्यंत हा पाऊस राहणार आहे. या कालावधीत उत्तर -पश्चिम हलकी हवा राहणार असून ४-७ प्रति किलो मीटर वा-याची गती राहणार आहे. संपुर्ण परिसरावर ढगांचे आच्छादन राहणार असून वायुमंडलीय दबाव ९३६-९३९ एचपईए एवढा राहणार आहे. वातावरणीय पर्जन्यमान ६, ४ किमी तर दृश्यमानता ८४.९६ टक्के एवढी राहणार आहे.


२६ सप्टेंबर रोजी सकाळी १ ते दुपारी १२ वाजेपर्यंत हलकी हवा राहणार असून हवेची गती ७ ते ११ प्रतिसाद किमी राहणार आहे. हवेतील गस्टस् १४ किमी प्रति तास राहणार असून संपुर्ण परिसरावर ढगांचे आच्छादन राहणार आहे. साक्षेप आदल्या ९२.९६ टक्के एवढी राहणार असून वायुमंडलीय दबाव ९३७-९३९ एचपईए एवढा राहणार आहे. वातावरणीय पर्जन्यमान ४,६ मिलीमीटर तर दृश्यमानता ५८.९३ टक्के एवढी राहणार आहे.
दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही संपूर्ण ढगांचे आच्छादन कायम राहणार असून हलका वारा राहणार असून वा-याची गती प्रति तास ११ किमी एवढी राहणार आहे. साक्षेप आदृता ८९.९३ टक्के तर वायुमंडलीय दबाव ९३६-९३९ एचपीए एवढा राहणार आहे.


संध्याकाळी ६ ते रात्री १२ ही स्थिती अशीच कायम राहणार आहे. या कालावधीत वातावरणीय पर्जन्यमान ८ मिलीमीटर एवढे राहणार असून दृश्यमानता २६-७० टक्के राहणार आहे. साक्षेप आदृता ९१.९५ टक्के असणार आहे.
२६ सप्टेंबर चा पावूस यावर्षीच्या पावसात अधिक दमदार होण्याची शक्यता हवामान विभागाने नोंदवली आहे. तेंव्हा काळजी घेत पावसाचा आनंद घ्या.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button