आंतरभारतीचे अध्यक्ष पांडुरंग नाडकर्णी तर कार्याध्यक्ष अमर हबीब


आंतरभारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी गोव्याचे पांडुरंग नाडकर्णी व कार्याध्यक्ष पदी आंबाजोगाईचे अमर हबीब यांची निवड करण्यात आली.
प्राचार्य सदाविजय आर्य यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन आंतरभारतीच्या विश्वस्त मंडळाने पदाधिकाऱयांची निवड केली. राष्टीय उपाध्यक्ष (महिला) संगीता देशमुख (वसमत), सचिव डॉ डी. एस. कोरे (पुणे) व कोषाध्यक्षपदी प्राचार्य डॉ उमाकांत चनशेट्टी (सोलापूर) यांची निवड करण्यात आली.आंतरभारतीची स्थापना साने गुरुजी यांनी केली. ही संस्था राष्ट्रीय एकात्मतेसाठी कार्य करते. प्राचार्य सदाविजय आर्य या संस्थेचे अध्यक्ष होते. 17 सप्टेंबर 22 रोजी त्यांचे आकस्मित निधन झाले त्यामुळे नवीन पदाधिकाऱयांची निवड करण्यात आली.
आंतरभारतीची स्थापना साने गुरुजी यांनी केली. ही संस्था राष्ट्रीय एकात्मतेसाठी कार्य करते. प्राचार्य सदाविजय आर्य या संस्थेचे अध्यक्ष होते. 17 सप्टेंबर 22 रोजी त्यांचे आकस्मित निधन झाले त्यामुळे नवीन पदाधिकाऱयांची निवड करण्यात आली.
पांडुरंग नाडकर्णी शिक्षण क्षेत्रातील जाणकार असून त्यांनी गोव्यात कथामालेचे कार्य केले आहे. 1975 पासून ते आंतरभारतीशी जोडले गेले आहेत.