राष्ट्रीय

अविस्मरणीय शास्त्रीय संगीत मैफिलीने गुणीजान संगीत समारोह गाजला

अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय गुणीजान संगीत समारोह शास्त्रीय संगीताच्या मैफिलीने गाजला. या महोत्सवात सहभागी झालेल्या सर्वच कलाकारांनी आपल्या संगीत आणि गायन सेवेच्या ताकदीवर सादर केलेल्या सादरीकरणाने रसिक श्रोते संमोहीत झाले होते.

परदेशी कलावंत नॅश नॉबर्ट यांनी उपस्थितांची मने जिंकली
तपस्वी गायक पद्मभूषण पंडित सी आर व्यास उर्फ गुणीजान यांना संगीत एक सांगीतिक मानवंदना देण्यासाठी मागील एक वर्षांपासून मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या अंबाजोगाई नगरीमध्ये लोकमत प्रस्तुत व ग्रेस फाऊंडेशन ,पंचम निषाद,वसुंधरा सेवा प्रतिष्ठान व मानावलोक यांच्या विद्यमाने गुनिजान संगीत समारोहाला प्रारंभ झाला.
यावर्षी महोत्सवाचे हे दुसरे वर्षे आहे. संगीत समारोहांमध्ये अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलावंतांनी आपली कला सादर करून रसिकांची मने जिंकली. पहिल्या सत्रामध्ये अमेरिका असतीत कलावंत नॅश नॉबर्ट यांनी आपल्या बासरी मधून जादुई स्वराने रसिकांना संमोहित केले.

मेष भारताला होम असे म्हणतात. मॅच हे म्युझिक ऑफ नऊ चे संस्थापक देखील आहेत. त्यांनी जगभरात भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. सिएटल मध्ये जन्मलेल्या ज्ञानेश यांनी १९९९ मध्ये पहिल्यांदा भारतात पर्यटक म्हणून भेट दिली होती. या देशाचे संगीत इथली संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्याकडे ते इतके ओढले गेले की त्यांनी २००३ पासून भारतालाच आपले कुटुंब बनवण्याचा निर्णय घेतला. जगविख्यात बासरी वादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे ते ज्येष्ठ शिष्य आहेत. भारतीय संगीताच्या महानतेवर ठाम विश्वास असणारा हा कलावंत बासरीच्या बाबतीत शुद्धतावादी आहे. जगभरातल्या अनेक मैफिलीमध्ये त्यांनी आपल्या कलेचे सादरीकरण केलेले आहे. अंबाजोगाई करांना त्यांनी आपल्या बासरी वादनाने अक्षरशः मंत्रमुग्ध केले. एकताल मध्ये पूर्व कल्याण सादर करून त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचे श्रेष्ठत्व रसिकांना दाखवून दिले. त्यानंतर त्यांनी पहाडी मधील दोन अत्यंत लिलया सादर केल्या. आलाप जोड झाला. विविध प्रकारच्या लयकारीयुक्त ताना त्यांनी सादर केल्या. त्यांना तबल्यावर साथ-संगत अजिंक्य जोशी यांनी अत्यंत सफाईदारपणे केली.बासरी त तबल्यात रंगलेल्या जुगलबंदीचा अनोखा स्वाद रसिकांना अनुभवता आला.

त्यानंतर कर्नाटक मधील करकला या गावांमध्ये जन्मलेले युवा प्रतिभाषा आली गायक सिद्धार्थ यांचे व्यासपीठावर आगमन झाले निसर्गतः प्रतिभाषाली आवाजाची देणगी लाभलेल्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाला सुरुवात झाल्यानंतर रसिक वर्ग अत्यंत तल्लीन झाला होता. ज्येष्ठ हिंदुस्तानी संगीतकार मंजुनाथ यांच्या तालमीत तयार झालेला सिद्धार्थ तसेच ज्येष्ठ गायक पंडित विनायक थोरवी यांचा गंडाबंद शागीर्द असलेला सिद्धार्थ अत्यंत कमी वयामध्ये प्रतिथयश गायक म्हणून नावारूपाला आलेला आहे.

जिरा मोरा प्यारा रखिये मोरे मन की बात

हिंदुस्तानी व कर्नाटक शैलीच्या गायक वादकांसोबत जुगलबंदी करणाऱ्या सिद्धार्थची आवाजावर प्रचंड मेहनत आणि पकड आहे. सिद्धार्थ यांनी विलंबित एकताल मध्ये जोग कंस रागातील “जीरा मोरा प्यारा रखिये मोरे मन की बात” या बंदिशीने गायनाला सुरुवात केली. विलंबित एकतालातील रचनेनंतर “जा रे खगवा लीजा संदेशवा मोरे पिया को” तसेच “हे जाने ना दूंगी बिहारवा” या तीन ताल मधील बंदिशी सादर केल्या. त्यानंतर “भवानी श्री देवी नारायणी जननी राजेश्वरी” ही नऊ मात्रेतील बंदिश सादर केली. आपल्या गायनाचा समारोप त्यांनी एक ताल मधील कराना गाऊन केला. निसर्ग दत्त आवाजाची देणगी लाभलेल्या सिद्धार्थ यांचे गायन म्हणजे रसिकांसाठी अनुपम पर्वणीच होती.

या समारोहातील प्रथम सत्राचा सिद्धार्थ यांच्या गायनाने समारोप झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक शशी व्यास यांनी केले.संचलन वैभव कुलकणी यांनी तर समारोह समितीचे नंदकिशोर मुंदडा, अनिकेत लोहिया, भगवानराव शिंदे,तालमार्तंड प्रकाश बोरगावकर,पांडुरंग देशपांडे, अंबादास चिक्षे, दगडू लोमटे, डॉ.निशिकांत पाचेगावकर यांनी उपस्थित कलावंतांचे स्वागत केले.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker