अल्पवयीन मुलीवर अत्याचार; बदनामीचे भितीमुळे आईची आत्महत्या


केज तालुक्यातील एका आदिवासी वस्तीवर आई-वडील बाजाराला गेल्याची संधी साधून पाहुणा म्हणून आलेल्या एकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. दरम्यान, या घटनेने ची बदनामी होईल, या भीतीने मुलीच्या आईनेही मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील एका गावात घडली.
आदिवासी समाजाच्या वस्तीवर घडला प्रकार
केज तालुक्यातील एका आदिवासी मुल समाजाच्या वस्तीवर ८ फेब्रुवारी २०२३ हा रोजी मुलीचे आई-वडील बाजाराला गेल्याची संधी साधून नात्यातीलच व्यक्ती घरी आला. घरी एकटीच असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निघून गेला.
तुझ्यावरपण अत्याचार करेन; जाब विचारणा-या मुलींच्या आई ला दिली धमकी
हा प्रकार मुलीने चार दिवसांनी आईला मुल सांगितला.
आई-वडील दुसऱ्या गावी त्यांच्या नातेवाइकांकडे गेले, तेथून एकाच्या मोबाइलवर कॉल केला असता, त्याच्या मामाने कॉल घेतला. यावेळी मुलीच्या आईला त्याने धमकी देऊन विनाकारण विषय वाढवू नको अन्यथा मुलीप्रमाणे तुझ्यावरपण अत्याचार करेन, अशी धमकी दिली. यामुळे मुलीच्या आईच्या मनावर परिणाम झाला व तिने तणावाखाली येऊन १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घरातील पत्र्याच्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच प पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार उ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अ दिलीप गित्ते, महादेव बहिरवाळ, शमीम पि पाशा यांनी घटनास्थळी जाऊन 3 पंचनामा केला उत्तरीय तपासणी साठी मृतदेह केज येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.
दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
पीडित मुलीचे वडील व मृत महिलेचा पती यांच्या तक्रारीवरून केज पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला म्हणून व आईला धमकी दिली म्हणून दोघांविरुद्ध केज पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पिंक पथकाच्या प्रमुख महिला पोलिस उपनिरीक्षक सिमाली कोळी करत आहेत.
अंबाजोगाईच्या “स्वारातीवै”त वैद्यकीय तपासणी
पीडित अल्पवयीन मुलीच्या आईच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी अंत्यसंस्कार केल्यानंतर मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी तिला अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात आणण्यात आल्याची माहिती महिला पोलिस उपनिरीक्षक सीमाली कोळी यांनी लोकमतशी बोलताना दिली.