अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; आरोपीस १६ वर्षे कारावासाची शिक्षा

लहान मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस सोळा वर्ष येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सोळा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
अंबाजोगाई येथील अप्पर सत्र न्यायाधीश श्रीमती एस.जे घरात यांचे न्यायालयात सुरु असलेल्या विशेष सत्र न्यायालय केस क्र. ०५/२०१६ महाराष्ट्र शासन विरुद्ध अमजद मुसा पठाण व एक विधी संघर्ष बालक दोघे रा. परळी यानी गल्लीतील पिडीत मुलास सायकल शिकवण्याचे आमिष दाखून व वीस रुपये देऊन सायकलवर वर घेऊन जाऊन बंद शाळेच्या भिंतीवरुन उतरुन बाथरूम मध्ये नेऊन अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला व त्यास शिवीगाळ करून चापटणे मारहाण करून ही बाब कोणाला सांगितली तर जिवे मारण्याची धमकी दिली.
सदरील घटना दि ०५-०३-२०१६ रोजी घडली. या प्रकरणीच्या फिर्यादीवरून दोन आरोपी विरुद्ध कलम ३७७.३२३.५०४.३४ भा. द. वी. सह कलम ६ वा.ले. आ. गुन्हा नोंद होऊन पोलीस अधीक्षक हरी बालाजी यांनी तपास करून दोषारोप पत्र दाखल केले. यातील दुसरा आरोपी वयाने लहान असल्याने त्याच्या विरुद्ध बाल न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते.
अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय
सादर प्रकरणात सरकार पक्षा तर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले पिडीताचा जबाब व इतर साक्षी पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस कलम ३७७ प्रमाणे पंधरा वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड व कलम ६ बा.ले.अ. प्रमाणे पंधरा रुपये दंड व कलम ३२३ प्रमाणे एक वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड तसेच कलम ३२३ प्रमाणे एक वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा दिली.
या प्रकरणात आरोपीने पिडीताचा जबाब नोदाविल्या नंतर लहान भावाचे जन्म प्रमाणपत्र दाखल करून व साक्षीदार देऊन मी ही लहान आहे त्यामुळे प्रकार बाल न्यायालयास पाठवावे म्हणून अर्ज केला होता, परंतु तो अर्ज खोटा आहे असे सरकार पक्षाने सिद्ध केले व त्यानंतर पिडीत याच्या आईने आम्ही फिर्याद गैरसमजुतीतून दिले व आरोपीचे
व आमचे सबंध चांगले आहेत असे लेखी म्हणणे दाखल केले होते. परंतु सरकार पक्षाच्या युक्ती वाद नंतर दोन्हीही कारणे फेटाळले.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अँड. अशोक विनायकराव कुलकर्णी यांनी काम पहिले त्यांना अॅड. नितीन पूजदेकर यांनी सहकार्य केले सादर प्रकरणात कोर्ट पैरवी म्हणून पो. हे को गोविंद कदम व पोहे को मंद तांदळे यांनी काम पहिले.

अशोक विनायकराव कुलकर्णी
सहा सरकारी अभियोक्ता अंबाजोगाई
