अमर हबीब यांना पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ पुरस्कार जाहीर
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/11/image_editor_output_image-459013923-1700225803864-273x300.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/11/image_editor_output_image-459013923-1700225803864-273x300.jpg)
२१ नोव्हेंबर रोजी होणार गौरव
ज्येष्ठ पत्रकार, लेखक, किसान पुत्र आंदोलनाचे जनक अमर हबीब यांना औरंगाबाद येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा इंन्स्टइट्यउट ऑफ सोशल इकॉनॉमिक रिसर्च ऍण्ड नॅशनल इंटिग्रेशन च्या माध्यमातून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेतर्फे दिला जाणारा २० वाढ “पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
औरंगाबाद येथील स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्था, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी येथे दिनांक २१ नोव्हेंबर २०२३ रोजी स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. बी. वराटे यांच्या हस्ते वितरण होणार असून या निमित्ताने कृषी भुषण विजय आण्णा बोराडे यांचे “वर्तमान स्थितीत मराठवाड्यासाठी पाण्याचे नियोजन” या विषयावर तर भुजल सर्वेक्षण विकास यंत्रणांचे सेवानिवृत्त संचालक डॉ. पी. एल. साळवे यांचे “सद्यस्थितीत मराठवाड्यातील भुजल पातळी” या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.