राष्ट्रीय

भारत बनला जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश!

युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड च्या अहवालात समोर आली माहिती!

भारत आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (UNFPA) च्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. भारतात आता चीनपेक्षा सुमारे ३० लाख जास्त लोक आहेत. या आकडेवारीनुसार भारताची लोकसंख्या १४२ कोटी -८६ लाख आहे. दुसरीकडे चीनची लोकसंख्या केवळ १४२ कोटी ५७ लाख आहे.

भारतात लोकसंख्या वाढीचा दर १.५६ टक्के

वर्षाच्या सुरुवातीलाच तज्ज्ञांनी २०२३ मध्ये भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. UNFPA च्या नव्या आकडेवारीनेही याची पुष्टी केलीआहे.
UN च्या अहवालानुसार भारताची लोकसंख्या एका वर्षात १.५६ टक्क्यांनी वाढली.

चीनच्या लोकसंख्येत सहा वर्षांपासून होतेय घट!

अहवालातील नवीन आकडेवारी ‘डेमोग्राफिक इंडिकेटर्स’ श्रेणीत देण्यात आली आहे. गछ १९५० पासून जगातील लोकसंख्येची आकडेवारी जाहीर करत आहे. त्यानंतर पहिल्यांदाच भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकले आहे. गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात असे दिसून आले आहे की, गेल्या ६ दशकांत प्रथमच चीनच्या लोकसंख्येमध्ये घट झाली आहे. चीनमधला जन्मदर ही कमी झाला असून तो यंदा मायनसमध्ये नोंदवला गेला आहे.

चीनमध्ये सरासरी आयुर्मान भारतापेक्षा चांगले!

चीनमधील सरासरी आयुर्मान भारतापेक्षा चांगले आहे. येथे पुरुषांचे सरासरी वय ७६ वर्षे आणि महिलांचे सरासरी वय ८२ वर्षे आहे. तर भारतात पुरुषांचे सरासरी वय ७४ वर्षे आणि महिलांचे सरासरी वय फक्त ७१ वर्षे आहे. णछत्रझ- भारताच्या प्रतिनिधीने सांगितले की, आता जगाची लोकसंख्या ८ अब्जांवर पोहोचली आहे. भारताच्या १.४ अब्ज लोकांकडे आम्ही १.४ अब्ज संधी म्हणून पाहणार आहोत. ते म्हणाले की, भारत हा एक शक्तिशाली देश
शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि आर्थिक विकासाच्या बाबतीत भारत सातत्याने पुढे जात आहे. तांत्रिक बाबींमध्ये आम्ही रोज नवनवीन विक्रम करत आहोत.

भारतात तरुणांची संख्या सर्वाधिक!

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, भारतातील २५% लोकांचे वय १४ वर्षांपर्यंत आहे. १०-१९ वयोगटातील १८% लोक आहेत. १०-२४ वयोगटातील लोकांची संख्या २६% आहे, त्यानंतर १५-६४ वयोगटातील सुमारे ६८% लोक आहेत. म्हणजेच भारतात तरुणांची सर्वाधिक संख्या आहे, पण चीनमध्ये तसे नाही. त्यातवृद्धांची संख्या सर्वाधिक आहे. चीनमध्ये २० कोटी लोक ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत.

आकडेवारी जाहीर केल्यानंतर, UNFPA च्या मीडिया सल्लागार अॅना जेफरीस म्हणाले की, भारताची लोकसंख्या चीनच्या लोकसंख्येच्या पुढे कधी गेली हे स्पष्ट नाही. दोन्ही देशांची आकडेवारी जाहीर करण्याच्या वेळेत खूप फरक आहे, त्यामुळे अंदाज बांधणे कठीण आहे. आपण सांगू शकतो की चीनची लोकसंख्या गेल्या वर्षी सर्वोच्च पातळीवर होती, त्यानंतर ती ८.५ लाखांनी कमी झाली. याउलट भारतातील लोकसंख्या सातत्याने वाढत आहे.

ही असू शकतात लोकसंख्या वाढीची कारणे!


१) जन्म-मृत्युदर :-

आपल्या देशात मृत्युदरात घट झालेली आढळून येते. परंतु जन्मदर मात्र त्या मानाने घटलेली नाही. आपल्या देशाचा १००० लोकांमध्ये जन्मदर २७.५ आहे व मृत्युदर ०.५ आहे. त्यामुळे लोकसंख्येत वाढ होते.

२) अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा :-

समाजामध्ये काही अंधश्रद्धा असतात. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, मेल्यावर पाणी पाजण्यास व अग्नी देण्यास इस्टेटीला वारस पाहिजे, मुलगाच पाहिजे, त्यामुळे मुलाची वाट पहात कुटुंबात माणसे वाढतात. मुलगी ही परक्याचे धन समजले जाते त्यामुळे मुलगा होईपर्यंत कुटुंब नियोजन केले जात नाही. काही वेळेस पहिल्या पत्नीला मुलीच झाल्या तर दुसरा विवाह केला जातो व त्या पत्नीकडूनही कुटुंब वाढविले जाते. त्यामुळे लोकसंख्येत वाढ होताना दिसून येते.

३) जन्म ही ईश्वरी देणगी आहे :-

काही समाजामध्ये कुटुंब नियोजन करणे पाप मानले जाते. जन्म ही ईश्वरीय देणगी समजले जाते. या अंधश्रद्धेपोटी लोकसंख्या वाढ होताना आढळून येते.

४) वैद्यकीय सुविधांचा अभाव व अज्ञान :-

वैद्यकीय सुविधा असून देखील त्या ग्रामीण भागामध्ये पोहोचत नाहीत. काही वेळेस कुटुंब नियोजनांच्या साधनांची माहिती असते. परंतू त्याची उपलब्धता नसल्यामुळे म्हणजेच या सुविधांचा अभाव असल्यामुळे तीचा वापर केला जात नाही. गैरसमजुती व अज्ञानामुळे माहिती देवून देखील त्याचा वापर केला जात नाही. या कारणांमुळे लोकसंख्येमध्ये वाढ होताना दिसून येते.

५) बालमृत्यू व अर्भक मृत्यूचे प्रमाण :-

ग्रामीण भागांमध्ये बालमृत्यूचे व अर्भक मृत्यूचे प्रमाण जास्त असल्यामुळे अनेक मुलांना जन्म दिला जातो. त्यामुळेही लोकसंख्येमध्ये वाढ होते.

६) मुलीच्या लग्नाचे वय :-

ग्रामीण भागामध्ये १५ ते १६ व्या वर्षीच मुलीचे लग्न करून दिले जाते. लग्न झाल्यावर लवकर मुले होतात. त्यावर नियंत्रण करण्याकरिता तिला कुटुंबनियोजनाबद्दलच्या साधनांचा व माहितीचा अभाव व अज्ञान असते. या वयामध्ये ती कोणत्याही गोष्टींचे निर्णय कुटुंबामध्ये घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे वयाच्या पस्तीसाव्या वर्षापर्यंत ती गर्भधारणा करू शकते. त्यामुळे अनेक अपत्य जन्माला येतात. हे देखील लोकसंख्या वाढीमध्ये भर घालणारे घटक आहेत.

७) निरक्षरता :-

आपल्या देशात निरक्षरतेचे प्रमाण जास्त आहे. निरक्षरतेमुळे अंधश्रद्धा वाढतात. अशी लोकसंख्या वाढली तर माणसाला अनेक अडचणींना तोंड दयावे लागते. शिवाय शासनालासुद्धा आरोग्य सुविधा व इतर सुविधा पुरविणे अवघड होते. तेव्हा ही लोकसंख्यावाढ थांबविण्यासाठी विविध स्तरावर अनेक प्रयत्न चालू आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागातील स्त्री पुरुषामध्ये जागृती निर्माण करणे गरजेचे आहे. लोकसंख्यावाढीमुळे अनेक अडचणी उभ्या राहतात. त्या संबंधीची जाणीव लोकांमध्ये निर्माण करायला हवी.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button