अन्नत्याग आंदोलन; आंतर भारती घेणार सक्रिय सहभाग


आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासठी व शेतकरी स्वातंत्र्यासाठी संकल्पबद्ध होण्यासाठी 19 मार्च रोजी होणाऱ्या उपोषण व सांगता समारंभात सक्रिय सहभागी होण्याचा निर्णय आंतरभारतीच्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला.
आंतरभारती आंबाजोगाईंच्या कार्यकारिणीची बैठक दत्ता वालेकर यांच्या अध्यक्षते खाली नुकतीच झाली. बैठकीला राष्ट्रीय कार्यध्यक्ष अमर हबीब उपस्थित होते.
अनिकेत डिघोळकर यांनी 19 मार्चच्या उपवासाची पार्शवभूमी सांगितली. मुकुंदराज सभागृह परिसरातील चिंचेच्या झाडा खाली शहरातील पत्रकार, नागरिक व आपण उपोषण करू. 19 मार्चच्या सगळ्या कार्यक्रमात आंतरभारतीच्या आजीव सदस्यांनी सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले.
बैठकीला वैजनाथ शेंगुळे, संतोष मोहिते, राजाभाऊ पिंपळगावकर, महावीर भगरे, शरद लंगे, ज्योती शिंदे अनिकेत डिघोळकर, राहुल शिंदे आदी उपस्थित होते.
व्याख्यानाचे होणार सांगता


सुदर्शन रापतवार यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षांपासून किसानपुत्र व्याख्यानमाला सुरू होत आहे. या व्याख्यानमालेचे पाहिले पुष्प महाराष्ट्र राज्य मराठी संघाचे अध्यक्ष पत्रकार वसंत मुंडे गुंफणार आहेत. या व्याख्यानानंतर सामुहिक उपवास सोडण्याने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.