एकल महिलांसाठी गेली अनेक वर्षांपासून सातत्याने काम करणाऱ्या येथील सामाजिक कार्यकर्त्या अनिता कांबळे यांना पुणे येथील वंचित विकास संस्थेच्या वतीने “अभया सन्मान” पुरस्कार जाहीर झाला आहे.
एकल महिलांसाठी सातत्याने काम
अनिता कांबळे या अंबाजोगाई -केज तालुक्यासह बीड जिल्ह्यातील इतर तालुक्यातील एकल महिलांसाठी गेली अनेक वर्षांपासून सातत्याने काम करीत आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेवून पुणे येथील वंचित विकास या संस्थेच्या वतीने अभया पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
वंचित विकास चे ३९ वर्षांपासून काम
वंचित विकास ही संस्था गेली ३९ वर्षांपासून महाराष्ट्र व मध्यप्रदेश या राज्यातील स्त्रिया, मुले, ललित, आदिवासी, भटके विमुक्त, शेतकरी, शेतमजूर व इतर घटकांमधील लोकांसाठी कार्यकरत आहे. या संस्थेच्या अभया मैत्री गटा तर्फे गेली दहा वर्षांपासून परिस्थितीशी दोन हात करुन मार्ग काढणा-या महिलांचा अभया सन्मान हा पुरस्कार देवून सन्मान करण्यात येतो. यावर्षी चा हा सन्मान अनिता कांबळे यांना जाहीर करण्यात आला आहे.
२४ मे रोजी होणार वितरण
२४ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता पुणे येथील श्रमिक पत्रकार भवन, गांजले चौक पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती वंचित विकास या संस्थेच्या वतीने प्रकल्प समन्वयक मिनाक्षी नवले, संचालक मिना कुर्लेकर, सुनिता जोगळेकर यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.