महाराष्ट्र

अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांना आदर्श वैद्यकीय शिक्षक पुरस्कार

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांना महाराष्ट्र ऑपथॉमॅलॉजिकल कॉन्फरन्स मध्ये आदर्श वैद्यकीय शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ. भास्कर खैरे यांनी वैद्यकीय क्षेत्रात नेत्रशल्य चिकित्सा विभागात पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केल्यानंतर वैद्यकीय शिक्षक आणि उत्कृष्ठ नेत्रशेल्य चिकित्सक म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली. नेत्र विभागातील अनेक अवघड आणि किचकट शस्त्रक्रिया त्यांनी अतिशय सहजतेने यशस्वी करुन दाखवल्या. कोवीड ची साथ येवून गेल्यानंतर मोठ्या प्रमाणावर उद्भवलेल्या म्युकरमायकोसीस च्या असंख्य रुग्णांवर ही त्यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करुन अनेक रुग्णांची दृष्टी वाचवली.
एक उत्कृष्ट वैद्यकीय शिक्षक, उत्कृष्ट नेत्र सर्जन आणि एक उत्तम प्रशासक म्हणून डॉ. भास्कर खैरे यांनी आपली ओळख निर्माण केली. नेत्र शैल्यचिकित्सक म्हणून त्यांनी केलेल्या कामाची दखल घेवून नुकत्याच नाशिक येथे झालेल्या ४३ व्या महाराष्ट्र ऑपथॉमॅलॉजिकल कॉन्फरन्स मध्ये डॉ. भास्कर यांचा संघटनेचे अध्यक्ष डॉ. भिडे यांच्या हस्ते उत्कृष्ट वैद्यकीय शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संघटनेच्या सचीव डॉ. रागिणी पारेख, डॉ. जिग्नेश तासाला, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, डॉ. विलास वांगिकर उत्कृष्ट वैद्यकीय शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सदरील पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. भास्कर खैरे यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker