गेली दोन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेली होळी येथील बालिका घुगे यांच्या दुर्दैवी अगत्याने अखेर काल रात्री येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग विभागातील अतिदक्षता विभागात उपचार घेत असतांनाच अखेरचा श्वास घेतला.
होळी येथील गर्भवती असलेल्या बालिका घुगे यांना सातव्या महिन्यातच प्रसुती कळा जाणवू लागल्याने येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्री रोग व प्रसुती शास्त्र विभागाच्या अंतयरुग्ण विभागात ८ जूलै उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
हालचाल होत नसल्याने बालकाला केले होते मृत घोषित
८ जुलै रोजी प्रीमॅच्चयुयर डिलिव्हरी झाल्यानंतर बालिका यांच्या बाळाने कसल्याही प्रकारची हालचाल न केल्याने तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी त्या बाळाला रात्रीच मृत घोषित केले होते.
रात्री गावाकडे नेवून अंत्यसंस्कार करणे शक्य नसल्याने बालिका हिचे वडिल सखाराम घुले यांनी सकाळी रुग्णालयात येवून बाळाचा कापडात गुंडाळून ठेवलेला मृतदेह पिशवीत टाकून ते अंत्यसंस्कार करण्यासाठी होळ या गावी घेऊन आले होते.
अंत्यसंस्कार करण्यापूर्वी बालकाने फुलवले त्याच्या व आजीच्या चेह-यावर हसू!
अंत्यसंस्कार करण्यासाठी खड्डा खोदण्याचे काम चालू असताना बाळाच्या आजीने बाळाचा शेवटचा चेहरा पाहून घ्यावा म्हणून त्यांच्या तोंडावर अलगद लावलेला पांढरा कपडा बाजूला सारून त्याचा चेहरा पाहिला असता बाळ खुदकन हसल्या चे आजीच्या नजरेस आले. आणि काही वेळाने बाळाने रडण्यास ही सुरुवात केली.
अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना घेतला अखेरचा श्वास
हे सर्व पाहून बाळाचे आजी आजोबा बाळाला घेऊन तातडीने स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात गेले. तेथे डॉक्टरांना सर्व परिस्थिती सांगितली. व बाळावर बाल रोग विभागाचा अतिदक्षता विभागात तातडीने उपचार सुरु करण्यात आले.
बाळाचा जन्म अवघ्या सातव्या महिन्यात झालेला असल्यामुळे अधिकच अशक्त असलेल्या बाळाने या अतिदक्षता विभागातील उपचारांना प्रतिसाद न देता अखेर काल ११ जुलै रात्री अखेरचा श्वास घेत या जगाचा निरोप घेतला.
मृत्यू पूर्वी व मृत्यू नंतर ही प्रश्नचिन्ह कायम?
या बाळाच्या जन्माने व निधनाने स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसुती शास्त्र विभाग व बाल रोग विभागावर प्रश्न चिन्ह निर्माण करुन ठेवले आहे. जिवंत असलेल्या बाळास मृत घोषित करणा-या डॉक्टरांचा तपास लागण्यापूर्वीच या बाळाने अखेरचा श्वास घेतला असल्यामुळे आता नेमका या बाळाचा मृत्यू कशामुळे झाला आहे हा ही प्रश्न निर्माण केला आहे?
चौकशी समितीच्या अहवाल केंव्हा येणार?
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्री रोग व प्रसुती शास्त्र विभागाच्या बाल रोग विभागाच्या अंतररुग्ण कक्ष विभागात घडलेल्या या लांच्छनास्पद घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. जिवंत असलेल्या बालकास मृत घोषित करणा-या डॉक्टरांच्या हलगर्जीपणाची चौकशी करण्यासाठी तत्कालीन अधिष्ठाता डॉ. राजेश कचरे यांनी तातडीने पाच सदस्यांची एक चौकशी समिती नियुक्त करुन स्त्री रोग विभागाचे प्रमुख यांचे कडून या संपूर्ण घटनेचा लेखी अहवाल मागितला आहे.
अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे यांनी त्वरीत जाहीर खुलासा करावा
दरम्यान दोन तात्पुरता पदभार देवून पुन्हा अधिष्ठाता पदी रुजू झालेले प्रभारी अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे हे पुन्हा काल ११ जुलै रोजी अधिष्ठाता म्हणून काम पहात आहेत. तातपुरते अधिष्ठाता यांनी विभाग प्रमुखांकडून मागवलेला अहवाल आला का? पाच सदस्यीय चौकशी समिती चार अहवाल केंव्हा येणार व सदरील बालकांचा अतिदक्षता विभागात झालेल्या मृत्यू ची नेमकी कोणती कारणे काय आहेत याची माहिती जाहीर करुन दोषी डॉक्टरांवर तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. आपल्या कामकाजाची पारदर्शकता दाखवण्याची ही नामी संधी अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे यांनी वाया घालवू नये.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.