अखिल भारतीय वंजारी समाजाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी भाजपाचे माजी आमदार गोविंद आण्णा केंद्रे यांची तर
उपाध्यक्ष पदी विधान परिषदेचे माजी सदस्य संजय दौंड यांची निवड करण्यात आली.
तेलंगणा राज्यातील येदुरागट्टा या ठिकाणी वंजारी समाजाची राष्ट्रीय परिषद नुकतीच पार पडली. या परिषदेला देशभरातील ७ राज्यातून हजारो वंजारा समाज बांधव उपस्थित होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी यजमान म्हणून अमरपेट हैदराबादचे आ. वेंकटेश कालेरू हे होते. देशभरातील वंजारी बांधवांच्या उपस्थितीत पार पडलेल्या भव्य अशा राष्ट्रीय परिषदेत वंजारी सेवा संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी भाजपाचे जेष्ठ नेते तथा माजी आमदार गोविंद अण्णा केंद्रे यांची एकमताने निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी विधान परिषदेचे माजी सदस्य तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक संजय दौंड यांची निवड करण्यात आली. या बैठकीस उपस्थित असलेल्या सर्व नेते अन् समाजातील कार्यकर्त्यांनी या निवडीचे उत्स्फुर्त असे स्वागत केले.
या बैठकीस ज्येष्ठ नेत्या प्रा. सुशीला मोराळे, माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्यासह तेलंगणा, महाराष्ट्र, राज्यस्थान देशभरातील वंजारी समाजातील मान्यवर आणि बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी समाजातील विविध प्रश्न व विषयावर प्रदीर्घ चर्चाही झाली.
सदरील निवडीबद्दल विधान परिषदेचे माजी सदस्य संजय दौंड, माजी आ. गोविंद अण्णा केंद्रे यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.