महाराष्ट्र
अक्षय मुंदडा यांच्या प्रभावी भाषणाची केज मतदार संघात होत आहे चर्चा!

अक्षय मुंदडा यांचा विरोधकांवर घणाघात
निवडणुका या पाच वर्षातुन फक्त एकदाच होतं असतात तेंव्हा निवडणुक प्रचारात प्रचारात खालची भाषा वापरुन नका, मी बोलायला चालू केलं तर मतदार संघात फिरणं मुश्कील होईल अशी घणाघाती टीका भाजपाचे युवा नेते अक्षय मुंदडा यांनी केली.
केज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकी निमित्ताने आ. नमिता मुंदडा यांच्या प्रचारासाठी केंद्रीय वाहतुक मंत्री ना. नितीन गडकरी आणि भाजपाच्या राष्ट्रीय सचीव आ. पंकजा मुंडे यांच्या सभेत बोलताना अक्षय मुंदडा यांनी ही घणाघाती टिका खा. बजरंग सोनवणे आणि राजकिशोर मोदी यांच्यावर केली.
आपल्या विस्तारीत आणि दमदार मनोगतात त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा निमित्ताने आपले राजकीय विरोधक करीत असलेल्या खालच्या पातळीवरील टीकेचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.

▪️तोंड दाखवायला ही जागा शिल्लक राहणार नाही
अक्षय मुंदडा यांनी आपल्या घणाघाती भाषणात अतिशय शांत स्वरुपात खालच्या पातळीवर टीका करणा-या विरोधकांविरुध्द आपली तोफ डागली. आपल्या बापाच्या जीवावर खाजगी गुत्तेदारीच्या माध्यमातून मोठं गबाळा कमावून त्यांच्याच विरोधात कटकारस्थान करणाऱ्या खासदारांनी आपल्याला राजकारण कसे करावे हे शिकवू नये. आपण गुत्तेदारी करतांना अवैध रितीने पैसै कमवतांना कोणकोणते धंदे केले आहेत याची मोठी यादी आपल्याकडे आहे ती यादी आपण सांगायला चालू केली तर मतदार संघात तोंड दाखवायलाही जागा शिल्लक राहणार नाही असे त्यांनी खडसावून सांगितले.

▪️ मुंदडा यांचे कार्यकर्ते डावलण्याचे
पाप पृथ्वीराज साठे यांनी केले!
माझी आई विमलताई यांच्या निधनानंतर प्रमाणिक पणे आम्ही त्यांचे कार्यकर्ते पृथ्वीराज साठे यांना विधानसभेत नेतृत्व करण्याची संधी दिली. तन मन धनाने साठे यांच्या मागे सर्व शक्ती उभी केली व साठे यांच्या गळ्यात विजयी माळ ही घातली. मात्र विजयानंतर काही दिवसांतच साठे यांनी आपले खरे स्वरूप दाखवायला सुरुवात केली. विमलताई यांच्या कार्यकर्त्यांना डावलून स्वतः घ्या कार्यकर्त्यांची फळी उभी करण्याचे पाव त्यांनी केले. शेकडो कार्यकर्त्यांच्या तक्रारी आमच्या कडे आल्या आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहानं तर मी त्यांच्यावरील अन्याय दुर करण्यासाठी राजकारणात आलो असे
अक्षय मुंदडा यांनी सांगितले. साठे यांनी विमलताईंच्या विचाराशी, कार्यकर्त्यांशी प्रामाणिक राहून काम केले असते तर मी आज राजकारणात ही दिसलो नसतो असे ही ते म्हणाले.

▪️विकास पुरुषावरही केली टिका!
आपल्या विस्तारीत भाषणात अक्षय मुंदडा यांनी अंबाजोगाई शहरात स्वतः ला विकास पुरुष म्हणून घेणा-या नेतृत्वावर ही प्रखर टिका केली. विकास पुरुषाने परवा आपल्या भाषणात आ. नमिता मुंदडा यांनी अंबाजोगाई शहर वासियांवर दीड कोटी रुपयांचा बोजा टाकला असे ते म्हणाले. मी या माध्यमातून विकास पुरुष आणि तुम्हाला ही स्पष्टपणे सांगू इच्छितो तो की, ज्या बोजाचा उल्लेख हे विकास पुरुष करताहेत तो बोजा आ. नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या शहराची परिस्थिती सांगितल्यानंतर स्वतः उचलला तो शहर वासीयांवर पडू दिला नाही.
विकास पुरुषांनी परवा आपल्या भाषणात मुंदडा परिवाराचा उल्लेख मुंदडा कन्स्ट्रक्शन कंपनी असा केला. मी आपल्या सांगू इच्छितो की, राजकारणात मुंदडा परीवार गेली ४० वर्षांपासून सक्रिय आहे. या ४० वर्षाच्या कालावधीत मुंदडा परिवारातील एकाही सदस्याने कोणत्याही शासकीय कार्यालयातुन एक नवा पैशाची गुत्तेदारी केल्याचे व बील उचलल्याचे दाखवावे, आपण राजकारण सोडून देवू. याउलट विकास पुरुषाने आपली नगर परीषदेवर सत्ता असतांना मात्र शहरातील रस्ते सोडून आपल्या व्यावसायिक जमिनीत रस्ते केल्याची अनेक उदाहरणे सांगता येतील अशी घणाघाती टिका ही केली.
आ. नमिता मुंदडा या स्वतः आर्किटेक्ट आहेत. त्यामुळे नवीन इमारत बांधकाम आणि रस्ते बांधकामासह इतर कामाचे तंत्रज्ञान व इतर शास्त्रीय माहिती त्यांना आहे.त्यामुळे मतदार संघात सुरु असणाऱ्या प्रत्येक कामावर प्रत्यक्ष जाऊन त्या योग्य सुचेना संबंधित अधिकारी आणि गुत्तेदार यांना करत असतात. कोणतेही शासकीय काम हे उच्च दर्जाचे व चांगलेच झाला पाहिजे हा त्यांचा आग्रह असतो. त्यांचे हे काम जर विकास पुरुषाला मुंदडा कन्स्ट्रक्शन कंपनी वाटत असेल तर ते त्यांचे अज्ञान आहे.

▪️आता खोटे बोलणं सहन करणार नाही
आपण लहाणपणापासूनच खुप चटके सहन केले आहेत. खुप लोकांना जवळून पाहीले आहे, त्यांचा अभ्यास ही केला आहे. यासर्व लोकांचा हव्यास पासुनच मी निशब्द झालो आहे. लोक मला म्हणतात मी कमी बोलतो, मी संपर्कात रहात नाही. हो हे खरेही आहे. माझा स्वभाव स्पष्ट आणि सडेतोड बोलणारा आहे. मला अन्याय सहन होत नाही. लोकांच्या संपर्कात आलो, त्यांच्याशी खरं बोलू लागलो तर ते लोकांना सहन होणार नाही म्हणून मी कमी बोलतो, लोकांशी संपर्क कमी ठेवतो. पण आता यापुढे मी माझ्यावर आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांवर कोणी खालच्या पातळीवर बोलण्याचा प्रयत्न केला तर मी अन्याय सहन करणार नाही.

