अंबाजोगाई ८ हजारांची लाच स्वीकारताना ग्रामसेवक पकडला !
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/09/image_editor_output_image1246103751-1663082086339.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/09/image_editor_output_image1246103751-1663082086339.jpg)
ग्रामसेवक अशोक पुजारी ८ हजारांची लाच स्वीकारताना पकडला
लाचलुचपत विभागाची कारवाई
अंबाजोगाई पंचायत समिती कार्यालयातील ग्रामसेवक अशोक विठ्ठल पुजारी हे ८ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत सापडले असून त्यांचे विरोधात अंबाजोगाई पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतची अधिक माहिती अशी की, लोकसेवक पुजारी अशोक विठ्ठलराव ग्रामसेवक ग्रामपंचायत धावडी ता.अंबाजोगाई जि.बीड, वय ५२ वर्ग ३ रा हनुमान मला आनंद गॅस एजन्सी जवळ, अंबाजोगाई मुळ राहणार- तेर ता.उस्मानाबाद जिल्हा उस्मानाबाद यांना ८०००/- ( आठ हजार रुपये) लाच स्विकारल्या बध्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड यांचेकडुन कारवाई करण्यात आली आहे.
दिनांक १३/०९/२०२२ रोजी तक्रारदार यांनी तक्रार दिली की, तकारदार यांना स्वच्छ भारत मिशन ग्रामपंचायत धावडी ता. अंबाजोगाई जि.बीड येथे सार्वजनिक शौचालयाचे काम तक्रारदार यांना ग्रामपंचायतीने दिली. तक्रारदार यांनी पुर्ण केलेल्या सार्वजनिक शौचालयाचे बिल काढुन दिल्याचा मोबदला म्हणुन लोकसेवक पुजारी हे १००००/- रुपये ( दहा हजार रुपये) लाचेची मागणी करत आहेत. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीड येथे तकार दिली.
सदर तक्रारीच्या अनुषंगाने आज दिनांक १३/०९/२०२२ रोजी पंचा समक्ष लाच मागणी पडताळणी असता लोकसेवक पुजारी यांनी तकारदार यांचे कडे १००००/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ८०००/ (आठ हजार रुपये) लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य केल्याने सापळा लावला असतां आले असता पुजारी यांना त्यांचे कडून पंचासमक्ष ८०००/- रुपये ( आठ हजार रुपये) लाच रक्कम स्विकारतांना पंचायत समिती कार्यालय, येथे रंगेहात पकडण्यात आले आहे.
पुजारी अशोक विठ्ठलराव ग्रामसेवक ग्रामपंचायत धावडी ता. अंबाजोगाई जि.बीड. वय ५० वर्ग-३ रा.हनुमान मळा आनंद गॅस एजन्सी जवळ, अंबाजोगाई मुळ राहणार- तेर ता. उस्मानाबाद जिल्हा उस्मानाबा विरुध्द पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सदरची कार्यवाही ही डॉ. राहुल खाडे अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक बीड यांचे मार्गदर्शनात शंकर शिंदे पोलीस उप-अधीक्षक, पोलीसदार सुरेश सांगळे, प्र युनिट यांनी कारवाई केली आहे.