अंबाजोगाई येथील इस्तेमाच्या दुआ प्रसंगी ना. धनंजय मुंडे यांची उपस्थिती
अंबाजोगाई येथे मुस्लिम समाजाच्या इस्तेमाच्या समारोपाच्या दुवाप्रसंगी आज राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी उपस्थिती लावली.
मुस्लिम धर्मगुरु अशी साधला संवाद
यावेळी ना. धनंजय मुंडे यांनी समारोपाच्या दुवाप्रसंगी उपस्थित मुस्लिम समाज बांधवांशी तसेच विविध धर्मगुरूंशी संवाद साधत इस्तेमाच्या समारोप प्रसंगाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व मुस्लिम समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
राजाभाऊ औताडे यांचे केले सांत्वन
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अंबाजोगाई चे तालुकाध्यक्ष राजेभाऊ औताडे यांच्या वडिलांचे नुकतेच दुःखद निधन झाले असून ना. धनंजय मुंडे यांनी सेलू आंबा येथील राजाभाऊ अवताडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन औताडे कुटुंबीयांचे संतन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, विधानसभा अध्यक्ष गोविंद देशमुख, ज्येष्ठ नेते दत्ता पाटील, शिवाजीराव शिरसाट, विलास बापू मोरे, विलास सोनवणे, अजित गरड, रणजित लोमटे, तानाजी देशमुख, गणेश देशमुख, राजाभाऊ पौळ, प्रवीण जगताप, बंडू शिंदे, शरद शिंदे, रामलिंग चव्हाण, लिंब्राज धुमाळ, धर्मराज पाटील, विठ्ठल कोकरे यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.