अंबाजोगाई (प्रतिनिधी)–
लातुर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेडिसीन विभागात कार्यरत असलेले सहाय्यक प्राध्यापक डॉ. किरण डावळे यांची महाराष्ट्र लोक सेवा आयोगाने सहयोगी प्राध्यापक म्हणून नियुक्ती केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये राज्यातील १२ सहयोगी प्राध्यापकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून या १२ सहयोगी प्राध्यापकांमध्ये डॉ. किरण डावळे यांचा प्रथम क्रमांक आहे.
डॉ. किरण डावळे हे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रथम अधिष्ठाता डॉ. कै. व्यंकटराव डावळे यांचे नातु तर प्रख्यात सर्जन डॉ. अरुण डावळे आणि प्रख्यात स्त्री रोग तज्ञ डॉ. सौ. चंद्रकला डावळे यांचे पुत्र आहेत. त्यांचे वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण लातुर येथील एमआयटी च्या वैद्यकीय महाविद्यालयात झाले आहे. यापुर्वीच डॉ. किरण डावळे यांनी स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेडिसीन विभागात लेक्चर म्हणून काम केले आहे. मेडिसीन विभागातील एक चांगला तरुण डॉक्टर म्हणून डॉ. किरण डावळे यांची ओळख निर्माण झाली आहे. डॉ. किरण डावळे यांच्या नियुक्ती बद्दल त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले.

डॉ. किरण डावळे यांची सहयोगी प्राध्यापक म्हणून नियुक्ती