अंबाजोगाई पिपल्स बॅंकेच्या अहमदनगर शाखेचे २५ फेब्रुवारीला उद्घाटन
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230223_142756-985x1024.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230223_142756-985x1024.jpg)
ना. राधाकृष्ण विखे पाटील, आ. धनंजय मुंडे व इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती !
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230223_142814-819x1024.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230223_142814-819x1024.jpg)
अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँक अहमदनगर शाखेच्या नूतन वास्तु चा उद्घाटन सोहळा दिनांक २५फेब्रुवारी , शनिवार रोजी विविध मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीत संपन्न होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास उद्घाटन म्हणून महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी मंत्री माननीय आमदार धनंजय मुंडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे, अहमदनगरचे आ. संग्राम जगताप , कर्जत जामखेडचे आ. रोहित पवार, कोपरगाव चे आमदार आशुतोष काळे, पारनेरचे आमदार निलेश लंके, अंबा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष रमेशराव आडसकर ,माजी आमदार पृथ्वीराज साठे माजी आमदार संजय दौंड, अहमदनगर महानगरपालिकेचे उपमहापौर गणेश भोसले, बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ऍड राजेश्वर चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230223_143440-1024x784.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230223_143440-1024x784.jpg)
.
अंबाजोगाई पिपल्स बँकेचे संस्थापक राजकिशोर मोदी यांनी बँकेची सुरुवात साधारण पणे सव्वीस वर्षापुर्वी अंबाजोगाई शहरात करण्यात आली. आज अंबाजोगाई पिपल्स बँक ही सोळा शाखांच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा देत आहे. तसेच आजपर्यंत हजारो सुशिक्षित बेरोजगार , लहान मोठे व्यावसायिकाना बँकेच्या माध्यमातून अर्थसहाय्य करून त्यांचा व त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न केला गेला असल्याचे दिसून यरत आहे .२०२२ हे वर्ष नुकतेच बँकेने रौप्यमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230223_143820-1024x1015.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230223_143820-1024x1015.jpg)
बँकेचे संस्थापक राजकिशोर मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांनी या रौप्यमहोत्सवी वर्षात अनेक लोकोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने कोव्हीड काळात भरीव कामगिरी बाजावणार्यांना कोव्हीड योद्धा म्हणून सन्मान, महारक्तदान शिबीर, महिलांना बँकिंग क्षेत्राची माहिती व्हावी यासाठी महिलांना मोफत बँकिंग प्रशिक्षण शिबीर, सर्वांच्या आरोग्यासाठी वॉकेथॉन, चला सोबत चालू या, प्रमोद सरकटे यांचा स्वर राज या ऑर्केस्ट्रा चे आयोजन, इयत्ता१०,आणि इयत्ता १२ च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन , महिला दिनानिमित्त महिलांचे एकपात्री नाटक, होम मिनिस्टर , खेळ रंगला पैठणीचा आदी कार्यक्रम वर्षभरात आयोजित करण्यात आले होते. यासर्व बाबींवरून अंबाजोगाई पिपल्स बँक ही सर्वसामान्यांची बँक म्हणून आज ओळखल्या जाऊ लागली आहे .
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230223_142838-1024x940.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230223_142838-1024x940.jpg)
सोळा शाखांच्या माध्यमातून आपली सेवा सामन्यातील सामान्य माणसाला देणारी अंबाजोगाई पिपल्स बँक कुठं स्वतः च्या जागेत तर कुठे भाड्याच्या जागेत कार्यरत आहे .अहमदनगर शहरातील बँक देखील आतापर्यंत भाड्याच्या जागेतच होती.मात्र आता ही बँक आपल्या स्वतः च्या जागेत स्थलांतरित होत असून या नवीन वस्तूचा उद्घाटन सोहळा विविध मान्यवरांच्या हस्ते व उपस्थिती मध्ये होत आहे याबाबत बँकेचा संस्थापक या नात्याने आनंद होत असल्याचे संस्थापक राजकिशोर मोदी यांनी सांगितले. या उदघाटन सोहळ्यास बँकेच्या सर्व ग्राहकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थापक राजकिशोर मोदी तसेच सर्व संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.