अंबाजोगाई जिल्हा जाहीर करा आ. नमिता मुंदडा यांची अधिवेशनात मागणी
अंबाजोगाई जिल्हा निर्मिती संदर्भात शहरात वेगवेगळी आंदोलने केली जात असतांनाच या विभागाच्या आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या अधिवेशनात अंबाजोगाई जिल्हा जा हीर करावा अशी मागणी लक्षवेधी प्रश्नाच्या माध्यमातून केली.
अंबाजोगाई जिल्हा निर्मिती संदर्भात बोलताना आ. नमिता मुंदडा पुढे म्हणाल्या की, अंबाजोगाई जिल्हा व्हावा ही खुप जुनी मागणी आहे. यासाठी स्व.विमलताई मुंदडा या राज्य मंत्रिमंडळात असतांनाही अनेक वेळा ही मागणी केली होती. अंबाजोगाई जिल्हा निर्मिती साठी आवश्यक असणारी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कार्यालय, सहाय्यक प्रादेशिक परिवहन कार्यालय, भुसंपादन कार्यालये व इतर कार्यालये स्वतंत्र इमारतीसह अंबाजोगाई येथे आहेत, त्यामुळे शासनाने अतिरिक्त आर्थिक बोजा येणार नाही.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230721-WA0248-1024x993.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230721-WA0248-1024x993.jpg)
अंबाजोगाई जिल्हा निर्मिती साठी तत्कालीन मंत्री डॉ. सौ. विमलताई मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी आंदोलन ही करण्यात आली आहेत. आता नव्याने ही मागणी पुन्हा करण्यात येत आहे. तेंव्हा शासनाने अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची घोषणा तातडीने करावी अशी मागणी आ. नमिता मुंदडा यांनी केली.
अंबाजोगाई जिल्हा निर्मिती होत असताना, जिल्ह्याच्या ठिकाणी आवश्यकता असणारी सर्व प्रमुख शासकीय कार्यालये आज रोजी अंबाजोगाई याठिकाणी कार्यान्वित आहेत.जिल्हा निर्मिती करीत असताना कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त आर्थिक बोजा शासनावर पडणार नाही. त्यामुळे अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या विषयाचा सरकारने जाणीवपूर्वक विचार करावा अशी मागणी आज विधिमंडळात केली.