अंबाजोगाई च्या अमोल लोमटे यांचा “पवन” अश्व राज्य स्पर्धेत प्रथम
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230224_163521-563x1024.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230224_163521-563x1024.jpg)
कोल्हापूर येथे भव्य देशी पशु प्रदर्शन पंचमहाभूत लोकोत्सव चेतक पुरस्कार 2023 चे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात अंबाजोगाई चे माजी नगरसेवक अमोल विजयकुमार लोमटे यांच्या पवन या अश्व (घोडा) ने प्रथम क्रमांक पटकवला आहे.
उत्कृष्ट नर अश्व म्हणून मिळाला पहिला क्रमांक
सिद्धगिरी महासंस्थान , कणेरी मठ तसेच भा.कृ.अ.प श्री सिद्धगिरी कृषि विज्ञान केंद्र कोटी – कोल्हापूर व पशुसंवर्धन विभाग , महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या भव्य पशु प्रदर्शनामध्ये सर्वोत्कृष्ट नर अश्व म्हणून अंबाजोगाई येथील मा. नगरसेवक अमोल लोमटे यांच्या पवन नावाच्या आश्वाने सर्वोत्कृष्ट नर अश्व म्हणून राज्यात प्रथम येण्याचा बहूमान मिळवत अंबाजोगाई शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230224_163618-254x300.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230224_163618-254x300.jpg)
स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र व १ लाख रु. देवून गौरव
अमोल लोमटे यांच्या पवन या अश्वाची निवड झाल्याबद्दल प्रमाणपत्र, ट्रॉफी तसेच एक लाख एक रुपये देऊन गौरविण्यात आले.सदरील बहुमान मिळाल्याचे समजताच अश्वप्रेमी मालक मा. नगरसेवक अमोल विजयकुमार व पवन या अश्व या दोघांवर सर्व स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.