महाराष्ट्र

अंबाजोगाई आडस रस्ता अत्याधुनिक करण्यासाठी ५० कोटींचा निधी मंजूर

आ. नमिता मुंदडा यांनी केले प्रयत्न

अंबाजोगाई – मागील अनेक वर्षापासून दुरावस्था भोगणाऱ्या अंबाजोगाई – आडस रस्त्याचे भाग्य उजळले आहे. केंद्रीय रस्ते विकास निधीतून या रस्त्यासाठी तब्बल ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी दिली. यानिमित्ताने आ. मुंदडा यांनी या रस्तेकामाच्या निधीसाठी केलेले विशेष प्रयत्न फलदायी ठरले आहेत.

अंबाजोगाई – आडस हा रस्ता मोठ्या वर्दळीचा रस्ता आहे. मागील काही वर्षात या रस्त्याची दुरावस्था झाली. ठिकठिकाणी खड्डे तर काही ठिकाणी रस्ता खचल्याने वाहनधारकांना गाडी चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खराब रस्त्यामुळे या रोडवर सतत लहानमोठे अपघात घडत असतात. त्यामुळे या रस्त्याच्या कामाला निधी मिळावा यासाठी आ. नमिता मुंदडा यांनी शासन दरबारी प्रयत्न सुरु ठेवले होते.

अखेर आ. मुंदडा यांच्या मागणीची दखल घेत शासनाने अंबाजोगाई – आडस रस्त्याच्या कामासाठी केंद्रीय रस्ते विकास निधीतून ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. लवकरच या कामाच्या निविदा प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. त्यामुळे आगामी काही महिन्यातच प्रवाशांच्या आणि वाहनधारकांच्या हालअपेष्टा संपणार असून त्यांना खड्डेविरहित गुळगुळीत रस्ता अनुभवयास मिळणार आहे. याबद्दल केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांचे आ. नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker