ठळक बातम्या

अंबाजोगाई आगाराच्या बसच्या एका फेरीने दिले १ लाख १४ हजारांचे उत्पन्न

अंबाजोगाई आगारातील अंबाजोगाई-चंद्रपूर एसटी बसने एका फेरीतून तब्बल एक लाख चौदा हजार रूपये एवढे विक्रमी उत्पन्न दिल्याने संबंधित वाहक चालक सुभाष गुंडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सतत तोट्यात चालणारी एसटी बस जेव्हा फायदा किंवा उत्पन्नाची बातमी देते तेव्हा प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होते. अशीच एक बातमी सध्या अंबाजोगाई आगारातील अंबाजोगाई – चंद्रपूर या बसच्या एका फेरीतून झालेल्या विक्रमी उत्पन्नाची होत आहे. दिवाळीच्या सणानिमित्त सध्या प्रवासी वर्गाची ये जा सुरू आहे. दरवर्षी दिवाळीच्या पंधरवडयात एसटी बसला चांगले उत्पन्न मिळते. अंबाजोगाई येथून लांब पल्याच्या अनेक बसेस धावतात. यातील अंबाजोगाई – चंद्रपूर ही बस अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र काल याच बसने मोठा विक्रम प्रस्थापित केला.

वाहक चालकांचा केला सत्कार…

एकाच फेरीतून तब्बल एक लाख चौदा हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले. सदर बसचे वाहक चालक सुभाष हुलगुंडे यांनी अथक मेहनत घेतल्याने ही कमाई झाली आहे. अंबाजोगाई आगाराला विक्रमी उत्पन्न मिळवून दिल्याबद्दल सुभाष हुलगुंडे यांचा येथील आगार प्रमुख चौरे यांनी अभिनंदन केले. तर वाहतूक नियंत्रक राऊत, एसटी चालक सिरसाट आदींनी सत्कार करून अभिनंदन केले.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker