महाराष्ट्र

अंबाजोगाईत भरदिवसा घरफोडी; साडेतीन लाखांवर मारला डल्ला!

अंबाजोगाई शहरातील सिल्व्हर सिटी वसाहतीत राहणा-या सतीष सुर्यकांत दहातोंडे यांच्या घरावर अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा डल्ला मारुन घराच्या आलमारीत ठेवलेल्या साडेतीन लाख रुपयांवर डल्ला मारला आहे. या प्रकरणी सतीष दहातोंडे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सतीष दहातोंडे यांनी पोलीस स्टेशनला दाखल केलेल्या फिर्यादीत पुढे असे म्हटले आहे की, मी सतिष सूर्यकांत दहातोंडे वय 49 वर्षे, जात कासार, व्यवसाय खाजगी नौकरी रा. सिल्वर सिटी, अंबाजोगाई ता. अंबाजोगाई जि. बीड आधार नंबर 7583 0739 8138 मो.नं. 9881711187 समक्ष पोलिस स्टेशन अंबाजोगाई शहर येथे येवून तक्रार देतो कि, वरील ठिकाणी मी व माझा मुलगा, असे राहत असुन व व्यंकटेश्वरा कंपनीमध्ये खाजगी मार्केटींगची नौकरी करतो त्याच बरोबर पोल्ट्रीचा व्यवसाय करतो. आज दिनांक 25/07/2023 रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या दरम्यान मी माझे घरान माझे काम करण्याकरीता व माझा मुलगा वरद वय 18 वर्षे हा माझे भावाचे दुकानावर आमच्या घराला कुलुप लावुन गेलो होतो. माझे काम करून मी व माझा मुलगा दुपारी 04:00 वाजण्याच्या दरम्यान आमचे घरी आलो असता माझे घराचा मुख्य दाराला लावेलेल कुलुप व काँडा तुटलेला व दाराची एक पट उघडी होती. मी घरात जावुन पाहीले असता घरामध्ये कोणीही दिसुन आले नाही. मी माझे बेडरूम मध्ये जावुन पाहीले असता माझे बेडरुम मधिल लाकडी कपाटाचे दोन्ही दार उघडे दिसले, व सामान अस्तावेस्त पडले होते. कपाटाचे ड्रॉवर उघडे होते. कपाटामध्ये माझे पोल्ट्री व्यवसायाचे ठेवलेले एकून 3,50,000 रुपये हे कोणतरी अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याचे दिसुन आले. आम्ही माझे घरामध्ये असलेले सिसिटीव्ही कॅमेरे चेक केले असता दुपारी 03:22 से 03:27 वा दरम्यान दोन अज्ञात इसम त्यापैकी एका इसमांच्या अंगावर निळसर रंगाचा व केशरी रंगाचा कॉलर असलेला टि शर्ट ज्याच्या पाठिमागे काहीतरी लिहलेले व डोक्याला पांढरा रुमाल बांधलेला व दुसऱ्या इसमांच्या अंगावर पांढरे कपडे असलेल्या दोन इसमांनी माझे घराच्या दरवाजाचा कड़ी कोंडा तोडुन माझे घरामध्ये प्रवेश करून कपाटातील पोल्ट्रीच्या व्यवसायाचे ठेवलेले 2000 रुपये दाराच्या 50 नोटा असे 1,00,000/- रुपये, 500 रुपये दाराच्या 400 नोटा असे 2,00,000/- रुपये, 200 रुपये दराच्या 200 नोटा असे 40,000/- रुपये व 50 रुपये व 20 रुपये दराचे नोटा असे 10.000/- रुपये असे एकुन 3,50,000/- रुपये वरील वर्णनाच्या दोन अज्ञात इसमांनी चोरून नेले म्हणुन मी माझा मुलगा वरद दहातोंडे, माझा भाऊ संतोष सुर्यकांत दहातोंडे असे मिळून आजुबाजुला अज्ञात इसमांचा शोध घेतला मिळुन आले नाहीत. आम्ही त्यांना पाहील्यास ओळख म्हणून माझी वरील ईसमान विरुध्द तक्रार आहे.
सदरील फिर्यादीवरून पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध भादविच्या कलम ३८०, ४५४, ३४ अन्वये गुन्हा र. नं. २८६/२०२३ दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चॉंद हमजा मेंडके हे करीत आहेत.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker