अंबाजोगाईत न्यायाधिशांच्या निवासासाठी १०.५ कोटींचा निधी मंजूर
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG_20230331_193303.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG_20230331_193303.jpg)
अंबाजोगाई येथील न्यायिक अधिकाऱ्यांसाठी १२ सुसज्ज निवासस्थाने बांधण्याकरिता राज्य शासनाने १० कोटी ६९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तसे आदेश शासनाने मंगळवारी (दि.११) निर्गमित केले आहेत. यासाठी केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी सातत्याने प्रयत्न केले होते.
अंबाजोगाई येथे दिवाणी न्यायालयासह जिल्हा अतिरिक्त व सत्र न्यायालय देखील आहे. या न्यायालयातील न्यायाधीशांच्या राहण्यासाठी अधिकृत निवासस्थान उपलब्ध नव्हते. स्वाराती रुग्णालयातील निवासस्थाने किंवा खासगी निवासस्थानांमध्ये न्यायाधीशांच्या राहण्याची सोय करण्यात येत होती. ही अडचण लक्षात घेता आ. नमिता मुंदडा यांनी न्यायाधीशांसाठी स्वतंत्र अधिकृत निवासस्थाने असावीत यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. अखेर, आ. मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश आले असून अमाजोगाई शहरात न्यायिक अधिकाऱ्यांसाठी १२ निवासस्थाने बांधण्यास शासनाने मंजुरी दिली असून लगोलग त्यासाठी १० कोटी ६९ हजार रुपयांचा निधी देखील उपलब्ध करून दिला आहे. लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, खासदार प्रीतमताई मुंडे यांच्या आ. नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत.