अंबाजोगाईच्या साक्षी शर्मा हिची महाराष्ट्र युवा सांसद सचीव पदी निवड


येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील बी.कॉम. प्रथम वर्ष
वर्गात शिकणारी विद्यार्थिनी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका साक्षी सुरेश शर्मा हिची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत महाराष्ट्र युवा संसद 2023 निवडणूक, राष्ट्रीय सेवा योजना युवा मंत्रालय, मुंबई येथे सचिव पदी निवड करण्यात आली.
17 व 18 एप्रिल रोजी मंत्रालयीन कामकाजात घेणार सहभाग!
दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी विद्यापीठाच्या संघाबरोबर साक्षी शर्मा ही विधान भवन मुंबई येथे दिनांक 18 व 19 एप्रिल 2023 रोजी मंत्रालय कामकाज, राज्यपाल भवन, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट अशा विविध उपक्रमात सहभागी होणार आहे. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी व विभाग प्रमुख डॉ इंद्रजीत भगत यांच्या मार्गदर्शनाखाली साक्षी शर्मा हीने हे अलौकिक यश मिळवले आहे.
या गौरवास्पद कामगिरी बद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाट, उपप्राचार्य प्रा. रमेश शिंदे, प्रा. प्रताप जाधव, प्रा. डॉ. मुकुंद राजपंखे आणि सर्व कर्मचाऱ्यांनी साक्षी शर्मा व प्रा. डॉ इंद्रजीत भगत यांचे विशेष अभिनंदन केले.
मराठवाड्यातील केवळ 8 विद्दार्थ्यांची निवड
संपूर्ण औरंगाबाद विभागातून केवळ आठ विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे ज्या चार मुले व चार मुली आहेत.
बीड जिल्ह्यातून साक्षी शर्मा ही एकमेव विद्यार्थिनी निवड करण्यात आलेली आहे. मुंबई येथील तिचा परफॉर्मन्स बघून तिला पुढे दिल्ली येथील युवा मंत्रालय कामकाजाकरिता संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे.