महाराष्ट्र

अंबाजोगाईच्या डॉ. दिपक कटारे यांनी केली कॅथेटर मार्गदर्शीत (Guided) थ्रोम्बोलिसिसची पहिली शस्त्रक्रिया

४१ वर्षीय महिलेचा वाचला हात!


परळी येथील ४१ वर्षीय महीलेवर अंबाजोगाई येथील ग्लोबल हार्ट केअर क्लिनिक चे संचालक प्रख्यात -हदयरोग तज्ञ डॉ. दिपक कटारे यांनी कॅथेटर गाइडेट थ्रोम्बोलिसिसची अवघड शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वी रित्या पुर्ण केली असून सदरील महिलेचा हात संभाव्य विच्छेदनापासून वाचवण्यात त्यांना यश आले आहे. ही अत्यंत अवघड आणि क्लिष्ट शस्त्रक्रिया लातूर आणि आसपासचा परिसरातील बहुदा पहिलीच शस्त्रक्रिया असावी असे मानले जात आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथील रहिवासी असलेले डॉ. दिपक कटारे यांनी आपल्या तालुक्यासह शेजारील जिल्ह्यातील -हदयरोग रुग्णांना अत्याधुनिक उपचार सुविधा मिळाव्यात म्हणून दोन वर्षापुर्वी ग्लोबल हार्ट केअर क्लिनिक ऍन्ड डायग्नोस्टिक सेंटरची सुरुवात केली. या क्लिनिकच्या माध्यमातून त्यांनी आज पर्यंत -हदयाच्या आजारासंबंधी अत्यंत क्लिष्ट असलेल्या हजारो यशस्वी शस्त्रक्रिया करुन अनेकांना आयुष्य वाढवले आहे.
आठ दिवसांपुर्वी डॉ. दिपक कटारे हे आपल्या ग्लोबल हार्ट केअर क्लिनिक ऍन्ड डायग्नोस्टिक सेंटर मध्ये रुग्ण तपासत बसले असता परळी वैजनाथ येथील एक क्रिटिकल पेशंट आपल्याकडे रेफर करीत आहे असा फोन आला.

परळी वैजनाथ येथील एक ४१ वर्षांची महिला त्यांच्या ओपीडीत आली. सदरील महिलेच्या डाव्या हाताचा रंग निळसर झाला होता . सदरील महिलेची तपासणी करतांना डॉ. दिपक कटारे यांना सदरील महिलेच्या डाव्या हाताची नाडी ही अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले. महिलेच्या इतर तपासण्या अंती तिला ब्रॅकियल आर्टरी थ्रोम्बोसिस झाला असल्याचे त्यांचे निदर्शनास आले. यापुर्वी डॉ. दिपक कटारे यांच्या ओपीडीत असे रुग्ण आले होते, मात्र सदरील रुग्णांवर शस्त्रक्रिया न करता त्यांना पुढील उपचारासाठी रक्तवाहिन्या संबंधी उपचार करणा-या सर्जन (CVTS) कडे त्यांनी रेफर केले होते.
सदरील महिलेची परिस्थिती वेगळी होती. एक तर तिची आर्थिक क्षमता या संपुर्ण उपचारासाठी लागणारा खर्च झेपेल एवढी सशक्त नव्हती आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे तिच्यावर २४ तासांच्या आत तातडीने उपचार करणे आवश्यक होते. अन्यथा तिचा हात विच्छेदन करावा लागण्याची शक्यता निर्माण झालेली दिसून येत होती. संभाव्य परिस्थिती, पुढे निर्माण होणारे धोके आणि विशेष म्हणजे रुग्ण आणि नातेवाईकांनी डॉक्टरांवर दाखवलेला विश्वास यामुळे सदरील महिलेवर तातडीने कॅथेटर मार्गदर्शीत थ्रोम्बोलिसिसची ची उपचार पध्दती सुरु केली. सदरील उपचार पध्दतीत हाताला रक्त पुरवठा करणारी अर्टरी जेंव्हा ब्लॉक होते तेंव्हा तो ब्लॉक काढण्यासाठी कॅथलॅब मधे फ्लुरोस्कोपी चा मार्गदर्शनाखाली पायातील आर्टरी मधून कॅथेटरची ट्युब टाकुन ज्या ठिकाणी रक्ताची गुठळी बनली आहे तिथे २४ तासासाठी सतत रक्त पातळ करणारे औषध जे हार्टअटॅकच्या रुग्णांन मध्ये गुठळी तोडण्या साठी वापरले जाते ते दिले जाते आणि नंतर रक्त पातळ करणाऱ्या औषधाने गुठली तुटते आणि बंद पडलेल्या आर्टरि चा रक्तपुरवठा सुरळीत होतो..

या पध्दतीने उपचार सुरु करताच दुसऱ्याच दिवशी सदरील महिलेचा निळसर पडत चाललेला हात पुन्हा पुर्ववत झाला. तिच्या डाव्या हातावरील सर्व संवेदना जागृत झाल्या एवढेच नव्हे तर तिच्या डाव्या हाताची अनुपस्थित झालेली नाडी ही आता स्पष्टपणे उपस्थित असलेली दिसून येत होती.
सदरील अत्यंत अवघड आणि क्लिष्ट उपचार पद्धतीमुळे ४१वर्षीय महिलेचा हात संभाव्य विच्छेदनापासून वाचवण्यात डॉ. दिपक कटारे यांना यश आले. सदरील अवघड उपचार पद्धती ही लातुर येथे डॉ. दिपक कटारे यांनी स्वतः केली. अशा पध्दतीच्या उपचार पद्धतीचा अवलंब करून एखाद्या रुग्णाचा हात विच्छेदनापासून वाचवण्याची ही लातूर आणि आसपासचा परिसरातील पहिलीच घटना आहे. सदरील उपचार पध्दती अवलंबून सदरील महिलेचा हात विच्छेदनापासून वाचवण्यात यश आल्याबद्दल डॉ. दिपक कटारे यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker