महाराष्ट्र
अंबाजोगाईच्या डॉ. गौरव वखरे यांची सोलापूर येथे आत्महत्या


अंबाजोगाई येथील खोलेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक वखरे यांचा मुलगा डॉ. वैभव वखरे याने सोलापूर येथे आत्महत्या केली आहे. सदरील घटनेमुळे वारे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
सोलापूर येथे सुरू होते पदव्युत्तर शिक्षण
या बाबत अधिक समजलेली माहिती अशी की, अंबाजोगाई येथील खोलेश्वर महाविद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक वखरे यांचा मुलगा डॉ. वैभव वखरे हा सोलापूर येथील डॉ. वंशपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऍनास्थेशिया विषयात यावर्षी प्रथम वर्षात पदवीचे शिक्षण घेत होता. वैद्यकीय महाविद्यालयाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात तो रहात होता. आज त्याने अचानक आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.